HW News Marathi
राजकारण

अनेक वर्षे मतभिन्नता होती, आजही आहे, उद्याही असू शकेल !

नागपूर | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून (१६ डिसेंबर) सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर, या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वीर सावकरांविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे विरोधकांनी आज (१५ डिसेंबर) मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर देखील बहिष्कार टाकला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेत पुढील मुद्दे मांडले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

  • मुख्यमंत्री म्हणून नव्या कारकिर्दीची सुरुवात होत आहे.
  • प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाची प्रथा.
  • विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकणं, ही पोटप्रथा.
  • संपूर्ण राज्यातील जनतेने आवाहन करतो कि, आपले आशीर्वाद आमच्यावर असू द्या
  • जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
  • शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याच्या दिशेने आम्ही पावले टाकत आहोत.
  • लवकरात लवकरच शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय घेऊ.
  • छत्रपतींच्या स्मारकामध्ये जर घोटाळा केला असेल तर तो अत्यंत निंदनीय
  • आमच्याकडे याबाबत तक्रारी आल्या आहेत. आरोपांमध्ये तथ्य आढळले तर दोषींवर योग्य ती कारवाई होणार.
  • सर्व अडचणी दूर करून राज्यालाच नव्हे तर देशाला अभिमान वाटेल असे छत्रपती शिवरायांचे स्मारक आम्ही उभारू.
  • आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे नेते. भिन्न विचारांची माणसे एकत्र आलो आहोत.
  • गेली अनेक वर्षे ही भिन्नता होती, आजही आहे, उद्याही असू शकेल.
  • सरकार म्हणून मात्र आमच्यात एकवाक्यता आहे.
  • आम्ही सावकरांविषयीची आमची भूमिका स्पष्ट केली आहे.
  • परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर काही करता येत नसेल तर देशात गोंधळ उडवा, लोकांना तणावात ठेवा, अशी भाजपची देशभरातील नीती
  • आमची सावरकरांविषयीची भूमिका आजही तीच, पुढेही तशीच राहील.
  • तुम्ही (भाजप) देशातील अल्पसंख्यांकांना असुरक्षित करत आहात
  • नागरिकत्व दुरुस्ती विधेयक घटनेला धरून आहे का ? हे आधी बघावे लागेल.
  • सावरकरांना भारतरत्न देण्याचा त्यांना अधिकार, आमच्या मागणीची वाट का पाहता ?
  • अधिवेशन ६ दिवसांचे असले, तरीही कार्यकाळ ५ वर्षांचा
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कमीत कमी बोला अन् बुधवारचे धक्के पचवून उभे रहा, शिवसेनेचा भाजपला सल्ला

News Desk

काँग्रेसने हे मान्य केले की, राहुल गांधी नापास झाले आहेत !

News Desk

आम्हाला बी टिम म्हणून हिणवणारे आता भाजपचे गुलाम !

News Desk