HW News Marathi
राजकारण

“एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून…”, सदा सरवणकरांचा शिवसेनेवर आरोप

मुंबई | “एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय,” असा आरोप शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी शिवसेनेवर केला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) आज (11 सप्टेंबर) दादर पोलीस स्ठानकाबाहेर माध्यमांशी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. “शिंदे गटाचे आमदारांवर आर्म्स अॅक्सअंतर्गत त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यांच्या गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही हलणार नाही,” असे सावंतांनी मागणी केली. या पार्श्वभूमीवर सदा सरवणकरांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या आरोपांचे प्रत्युत्तर देत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसेनाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ही घटना जेव्हा घडली होती. तेव्हा पोलिसांच्या मध्यस्थी केल्यनंतर संपूर्ण प्रकरण शांत झाले होते. परंतु, हे प्रकरणात काल (10 सप्टेंबर) शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केली, असा आरोप म्हणजे  शिवसेनेचे आमदार सुनील शिंदेंनी केला होता. यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या 25 जणांवर गुन्हा दाखल केला होता आणि पाच जणांना अटक केली होती.

सदा सरवणकर यांनी त्यांच्या आरोपावर प्रत्युत्तर देत म्हणाले, “मी सोशल मीडियावरूनच उत्तर द्यायचे असते. घरी जाऊन मारहाण करणे योग्य नाही. मला बदनाम करण्यासाठी हे सर्व प्रकार आहे. मी काम करून आमदार झालो आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे. सरवणकर पुढे म्हणाले, “माझ्या बंदुकीला परवागी दिली आहे. पण, मी गोळीबार केलेला नाही. पोलीस आपले काम करतील.

 

मुंबईतील प्रभादेवीत (Prabhadevi) शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात रात्री राडा झालाय. यावेळी आमदार सदा सरवणकर (Shinde Group MLA Sada Sarvankar) यांनी गोळीबार केल्याचा त्यांच्यावर आरोप केला जातोय. प्रभादेवीत सदा सरवणकर यांनी दोन वेळेस गोळीबार केला असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. शिवसेनेने केलेल्या दाव्यानुसार सरवणकर यांच्या गोळीबारात शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत (Mahesh Sawant) आणि एक पोलीस अधिकारी बचावलाय. परंतु,  सरवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्याकडे बंदुकीचा परवाना आहे. परंतु, मी गोळीबार केलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, आसा आरोप सरवणकर यांनी शिवसेनेवर केलाय.

सरवणकर म्हणाले, “सणावेळी असे एकमेकांना डिवचण्याचे प्रकार व्हायला नको पाहिजेत. परवा रात्री पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर आम्ही घरी आलो होतो. परंतु, काल रात्री आमच्या एका कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. त्यामुळे मी तिकडे गेलो.  असे वाद व्हायला नको पाहिजेत. गणपती विजर्सनादिवशी जे झालं ते  तेथेच संपलं होतं मग पुढे विषय वाढवायला नको होता.  ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. ही माहिती मिळाल्यानंतर मी तेथे गेलो होतो.

“मला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी बदनामीला कामातून उत्तर देऊ. परिस्थिती शांत करण्यासाठी आम्ही प्रभादेवी येथे गेलो होतो. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. माझ्याकडे बंदुकीचा परवाना आहे. पोलीस आपलं काम करतील. वर्षानुवर्षे एका कुटुंबात असलेल्या लोकांनी वाद करणं बरोबर नाही. भविष्यात असे वाद होणार नाहीत याची काळजी घेतली नाही. माझ्या हातून गोळीबार झालेला नाही. परंतु, याला वेगळं स्वरूप देऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, असे सरवणकर यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

“शिवसेना रस्त्यावर उतरेल, मग खरी शिवसेना काय…”, अरविंद सावंतांचा शिंदे गटाला इशारा

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करणार! – मुख्यमंत्री

Aprna

अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे

News Desk

महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर माझ्याशी गाठ

News Desk