HW News Marathi
राजकारण

यंदा आपल्याला प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करायचा आहे !

मुंबई | “यंदा आपल्याला प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करायचा आहे. म्हणूनच, यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जनादरम्यान जलप्रदूषण करू नका, प्लास्टिकमुक्त विसर्जन करा” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदी शनिवारी (७ सप्टेंबर) मुंबईत मेट्रो मार्गिकांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते.पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोच्या तीन मार्गिकांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी “गणपती बाप्पा मोरया”ची घोषणा आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध प्रकल्पांवर फडणवीस सरकार प्रचंड वेगाने काम करत आहे. राज्याच्या विकासासाठी फडणवीस सरकार घेत असलेल्या मेहनतीचा मी स्वतः साक्षीदार आहे”, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री फडणवीस आणि फडणवीस सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा उल्लेख आपला लहान भाऊ म्हणून केला आहे.

इस्रोच्या महत्त्वाकांक्षी अशा ‘चांद्रयान-२’ मोहिमेत आलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर देखील पंतप्रधान मोदींनी भाष्य केले आहे. “सध्या आपल्या ‘मिशन चांद्रयान’मध्ये एक अडथळा निर्माण झाला आहे. मात्र, आपले वैज्ञानिक प्रचंड मेहनती आणि हुशार आहेत. ते मागे हटणार नाहीत. चंद्रावर पोहोचण्याचे आपले स्वप्न निश्चित पूर्ण होणार”, असा विश्वास देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पियुष गोयल देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

Aprna

नाव छत्रपतींचे, काम अफजलखानाचे

News Desk

राम मंदिराचाही अध्यादेश काढा ! – उद्धव ठाकरे

News Desk