मुंबई | नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या देणारी दोन पत्रे मंत्रालयात आली आहेत. तर या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेविषयी अधिक सतर्क राहण्याचे आदेश, राज्याच्या गृह विभागाने सुरक्षा यंत्रणेला दिले आहेत.
एप्रिल महिन्यात पोलिसांच्या कारवाईत मोठ्या संख्येने गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर आलेल्या धमक्यांच्या दोन पत्रांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, त्यांचे कुटुंबीय आणि गडचिरोलीतील कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जाईल आणि आम्ही त्या घटनेचा बदला घेऊ, अशा धमक्या देणारी पत्रे मंत्रालयात आली आहेत.
आम्ही ‘मार्क्सवादी’विचारांनी प्रेरित आहोत. आमच्यातील काही जणांना ठार करुन तुम्ही आमचा विचार संपवू शकणार नाही. गडचिरोलीत जे काही घडले त्याचा हिशेब नक्कीच होईल, अशा आशयाची भाषा त्या पत्रांमध्ये वापरण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . ही पत्रे नेमकी कुठून आली आहेत याचा कसून तपास गृह विभाग सध्या करत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.