HW News Marathi
राजकारण

आज देशभरात महाराष्ट्रासह ९ राज्यातील ७१ मतदारसंघासाठी होणार मतदान

मुंबई | देशभरात आज (२९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रासह देशभरात ९ राज्यातील ७१ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकूण १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. हा टप्पा महाराष्ट्रातील लोकसभेचा चौथा आणि अंतिम टप्पा आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. देशात एकूण ७ टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे.

चौथ्या टप्प्यात येणाऱ्या नंदुरबारमध्ये भाजपचे डॉ. हिना गावीत आणि कॉंग्रेसचे के.सी पडवी, ठाण्यात शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मलिक्कार्जुन पुजारी, नाशिकमध्ये शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भूजबळ तर वंचित बहूजन आघाडीचे पवन पवार, पालघरमध्ये शिवसेनेचे राजेंद्र गावित, कॉंग्रेसचे सुरेश पडवी आणि बहुजन विकास आघाडीचे बाळाराम पाटील, शिरूरमधून शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे, मावळमधून शिवसेनेकडून श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीकडून पार्थ पवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

मुंबई उत्तरमधून भाजपचे गोपाळ शेट्टी आणि कॉंग्रेसच्या उर्मिला मातोंडकर वंचित बहुजन आघाडीचे सुनील थोरात, उत्तर मध्य मुंबईमधून भाजपच्या पूनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त, दक्षिण मुंबईमधून शिवसेनेकडून अरविंद सावंत आणि काँग्रेसकडून मिलिंद देवरा, दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेकडून राहुल शेवाळे आणि काँग्रेसकडून एकनाथ गायकवाड, वायव्य मुंबईतून शिवसेनेकडून गजानन किर्तीकर आणि काँग्रेसकडून संजय निरुपम, ईशान्य मुंबईतून भाजपकडून मनोज कोटक आणि राष्ट्रवादीकडून संजय दीना पाटील निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काहींना हे आरक्षण फार काळ टिकू नये असे वाटते !

News Desk

माझ्यासोबत १० मिनिटे तुम्ही कोणत्याही मंचावर चर्चा करावी !

News Desk

राजू शेट्टींना सरकारकडून चर्चेचे निमंत्रण; चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित

Chetan Kirdat