मुंबई | मंगळवार ११ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या हिवाळी अधिवेशनात एकूण २० बैठका होणार आहेत. आज मंगळवारी माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी आणि संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांच्या निधनावर श्रध्दांजलीपर भाषण होऊन दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात येईल. यामुळे खऱ्या अर्थाने बुधवारपासून अधिवेशनाचे कामकाज सुरु होईल. विरोधी पक्षाकडून विविध मुद्दयांवर सरकारला घेरण्याचा पुर्ण प्रयत्न असणार आहे. तर सरकार कडून जास्तीत जास्त बील पारित करण्याचा प्रयत्न असणार आहे.
राफेल डील, इव्हिएम, महीला सुरक्षा, महागाई, पेट्रोलच्या किमती, आरबीआयचा मुद्दा अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्ष सरकारवर निशाना साधण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाचे ८ जानेवारीपर्यंतचे वेळापत्रक जाहीर झाले असले तरी निवडणुकीला सामोरे जाण्यापुर्वी ३० जानेवारी ते फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हिवाळी अधिवेशनाच्या उत्तरार्धात मोदी सरकारने हंगामी अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी ठेवली आहे.
मोदी सरकारसाठी शेवटच्या ठरणाऱ्या संसदेच्या या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सत्रा दरम्यान विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना बील पास करण्याच्या कर्यात मदत करावी अशी अपील केली आहे. सर्वच विषयावर चर्चा व्हावी, संवाद व्हावा यासाठी आम्ही जास्त वेळ काम करण्यास तयार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.
PM Modi ahead of #WinterSession: This session is important, many issues of public importance will be taken up. I have faith that all the members of the Parliament will respect this sentiment and move ahead. Our efforts are that discussions are held on all issues. (File pic) pic.twitter.com/QZip9gX7th
— ANI (@ANI) December 11, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.