नवी दिल्ली | ‘तिहेरी तलाक’ विधेयक सोमवारी(३१ डिसेंबर) राज्यसभेत मांडण्यात येणार आहे, तर हे विधेयक लोकसभेत गुरुवारी (२७ डिसेंबर) मंजूर झाले आहे. या लोकसभेत विधयकाच्या बाजूने २४५, तर विरोधात ११ मते पडली होती. या विधेयकाला राज्यसभेत काँग्रेस आणि मित्र पक्ष विरोध करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Triple Talaq Bill that makes practice of instant divorce among Muslims criminal offence with provision of three-year jail term for erring husband, is set to be tabled in Rajya Sabha by Union Law Minister Ravi Shankar Prasad
Read @ANI story | https://t.co/9LiyebnasA pic.twitter.com/RgZFP9NoL4
— ANI Digital (@ani_digital) December 30, 2018
सत्तारूढ भाजपाने वरिष्ठ सभागृहात व्हिप जारी करून आपल्या सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कायदामंत्री रविशंकर प्रसाद राज्यसभेत हे विधेयक सादर करणार आहेत. विरोधाकांनी तिहेरी तलाकच्या तरतुदीबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या विधेयकावर आणखी विचार करण्यासाठी ते संसदेच्या संयुक्त निवड समितीकडे पाठविण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.