HW News Marathi
राजकारण

जेव्हा उदयनराजे डंपर चालवतात…

सातारा | शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आपल्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतात. शनिवारी (आज) त्यांनी चक्क डंपर चालवत साताऱ्याच्या रसत्यावर फेरफटका मारला.

सातारा नगरपरिषदेने शहरातील विविध कामांसाठी जेसीबी, डंपर आणि ट्रॅक्टर खरेदी केले होते. त्याचे पूजन खासदार उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उदयनराजेंनी डंपर चालवत शहरातून फेरफटका मारला.

दरम्यान, उदयनराजेंच्या डंपर चालवल्यामुळे नगराध्यक्ष, नगरसेवकांसह अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच धांदल उडाल्याचे पहायला मिळाले. मात्र सातारकरांसाठी उद्यन राजेंना डंपर चालवताना पहाणे ही एक पर्वणीच ठरली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदी बिनकामाचे, राहुल गांधींची बोचरी टीका

News Desk

दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावर शिवसेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव; उद्या होणार सुनावणी

Aprna

राज ठाकरे विरोधी गोटात सामिल होणार ?

swarit