सातारा | राज्यातील गुरुवारी (२४ ऑक्टोबर) विधानसभेसोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल देखील जाहीर झाले. मात्र, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला. राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा दारुण पराभव केला. दरम्यान, या पराभवानंतर प्रथमच उदयनराजे भोसले यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. “आदरणीय पाटीलसाहेब जिंकले हे खरं आहे. पण लोकसेवा काय केली ? हे देखील लोकांनी पाहिले पाहिजे”, असे उदयनराजे भोसले माध्यमांशी बोलताना म्हणाले.
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी तब्बल ६ लाख ३६ हजार ६२० मताधिक्याने प्रस्थापित खासदार उदयनराजे भोसले यांचा दारुण पराभव केला. साताऱ्यात असलेले उदयनराजेंचे प्रस्थ पाहता त्यांचा हा पराभव अनेक गोष्टींचे आत्मचिंतन करण्यास लावणारा आहे. दरम्यान, आपल्या पराभवानंतर दुसऱ्या दिवशी उदयनराजेंनी ट्विटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर, आता माध्यमांशी बोलताना “रडीचा डाव मी खेळत नाही. या पराभवाने मी खचणार नाही. यानंतरही मी कार्यरत राहणारच आहे”, असेही उदयनराजे भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.
पराभवानंतर उदयनराजेंनी काय ट्विट केले ?
“आज हरलो आहे पण थांबलो नाही, जिंकलो नाही पण संपलो ही नाही. लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखों जनतेचे तसेच दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. सदैव आपल्या सेवेशी तत्पर”, असे ट्विट करत उदयनराजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“रडीचा डाव मी खेळत नाही. आदरणीय पाटीलसाहेब जिंकले हे खरं आहे. पण लोकसेवा काय केली हे लोकांनी पाहिले पाहिजे.
यापुढेही मी जनतेसाठी कार्यरत राहणार असून खचणार नाही. pic.twitter.com/OwSHmcOc0q— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) October 26, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.