HW Marathi
राजकारण

…तर मी कधीच दुष्काळ निवारणाबाबतचा निर्णय घेतला असता !

सातारा | महाराष्ट्र सध्या मोठ्या दुष्काळ समस्येचा सामना करत आहे. अर्धा जून महिना संपला तरीही अद्याप राज्यात मान्सून दडी मारून बसला आहे. याच पार्श्वभूमीवर साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “आपल्या देशात लोकशाही आहे. देशातील लोकच या लोकशाहीचे राजे आहेत. त्यामुळे राज्यातील दुष्काळावरही त्यांनीच निर्णय घ्यावा. जर राजेशाही असती, तर मी कधीच राज्यातील दुष्काळ निवारणाबाबतचा निर्णय घेऊन मोकळा झालो असतो”, असे विधान उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

राज्यातील भीषण दुष्काळस्थितीमुळे सध्या राज्यातील पाणी प्रश्न गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यातही जून महिन्याची १० तारीख उलटून गेली तरीही अद्याप राज्यात मान्सूनची म्हणावी तशी हजेरी लागलेली नाही. यावर उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी उदयनराजेंनी राज्यात होणाऱ्या पाण्याच्या राजकारणाबाबतही आपली प्रतिक्रिया दिली आहे. “कोणताही प्रकल्प होताना ज्या-त्या तालुक्याला आरक्षित ठेवले गेलेले पाणी ज्या-त्या तालुक्याला मिळावे हीच लोकांची मागणी होती. मी इथे कोणतेही राजकारण करण्यासाठी बसलेलो नाही”, असे म्हणाले.

“भाजपने नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वात बारामतीला जाणारे अनियमित पाणी वळविण्याचा निर्णय घेतला तो योग्यच आहे”, असे विधान उदयनराजे भोसले यांनी म्हटले होते. निरा डावा कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला होता. तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देखील नीरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे पाणी बंद करण्याची मागणी केली होती. उदयनराजे यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

Related posts

#ArunJaitley : महाजनादेश यात्रा पुढच्या दोन दिवसांसाठी स्थगित

News Desk

राज्यात काहीही नवे घडले की माझ्याच नावाची चर्चा !

News Desk

पंतप्रधान मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीला शरद पवार लावणार हजेरी

News Desk