मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता पुन्हा एकदा अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या १८ नवनिर्वाचित खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे १६ जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. अयोध्या राम मंदिराचा मुद्दा चांगलाच तापलेला असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे, २४ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे सहकुटुंब दाखल झाले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांचा तो अयोध्या दौरा २४ तासांच्या आतच संपला होता. “आज पहिल्यांदाच अयोध्येत आलो आहे. मात्र, आता वारंवार येत राहीन”, असेही उद्धव ठाकरे आपल्या पहिल्या अयोध्या दौऱ्यात म्हणाले होते. आता, १६ तारखेला उद्धव ठाकरे आपल्या विजयी खासदारांसह पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
Shiv Sena chief Uddhav Thackeray along with all 18 party MPs will visit Ayodhya on June 16. (File pic) pic.twitter.com/mc90r6Q2Qi
— ANI (@ANI) June 7, 2019
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर सर्वच शिवसैनिक अत्यंत उत्साहाने या अयोध्या दौऱ्याच्या तयारीला लागले होते. लोकसभा निवडणुकांपूर्वी शिवसेनेने अयोध्या राम मंदिराबाबत आक्रमक भूमिका घेत भाजपला देखील धारेवर धरले होते. “संसदेत राम मंदिराबाबत कायदा केला तर शिवसेना पाठीशी असेल. मात्र, राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा. आता हिंदू वाट पाहणार नाही. तुम्ही विसरलेल्या वचनांची माहिती देण्यासाठी आज मी येथे आलोय”, असेही उद्धव ठाकरे त्यावेळी भाजपला उद्देशून म्हणाले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.