HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

ईशान्य मुंबईच्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू

मुंबई | ईशान्य मुंबईतील तिढा सोडविण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चा होणार आहे. ईशान्य मुंबईतील किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीच्या तिढ्यावर तोडगा काढणार ही बैठक बोलविण्यात आली आहे.

तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यांचा कार्यक्रम आणि जिल्हा-तालुका पातळीवरचे मतभेद मिटवण्यासाठी चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना चहापानाच्या कार्यक्रमाला बोलावून समन्वय साधण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे या निमित्ताने करणार आहेत.

 

Related posts

फैजपूर येथे ४ ऑक्टोबरला काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

News Desk

उत्तर भारतीयाला मारहाण केल्याप्रकरणी ३ शिवसैनिकांना अटक

Gauri Tilekar

राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत, ते पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील !

News Desk