HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

शरद पवार जर या देशाचे पंतप्रधान झाले तर देश विकायला काढतील !

मुंबई | “शरद पवार जर या देशाचे पंतप्रधान झाले तर ते देश विकायला काढतील”, अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील सभेत केली होती. “काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी ‘गरिबी हटाव’ची घोषणा केली होती. त्यानंतर गांधींची गरीबी हटली परंतु आपला गरीब गरीबच राहिला”, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला आहे. ५६ पक्ष एकत्र आले तरी हे भगवं वादळ कुणीही रोखू शकत नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. सर्व जागा महायुतीच जिंकणार. काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडी एकही जागा जिंकणार नाही, असा दावा देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी केला आहे.

“ते देशद्रोहाचे कलम काढून टाकण्याची भाषा करतात मात्र आम्ही देशद्रोह्यांना फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधी हे कन्हैया, दाऊद सारख्यांना वाचविण्यासाठी देशद्रोहाचा कायदा काढून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, ही इटली नाही. हा भारत आहे. इथे देशद्रोह्यांना जागा नाही”, अशी टोकाची टीका देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे. आजपर्यंत देशावर जेव्हा दहशतवादी हल्ले झाले तेव्हा त्यांना प्रत्युत्तर दिले गेले नाही. परंतु, मोदीजी आता पाकड्यांचे कंबरडे मोडा. यापुढे आपल्यावर हल्ले करायला हे लोक शिल्लकच राहता कामा नयेत. विरोधकांनी भारतीय जवानांच्या शौर्याचे राजकारण करणे त्यांचे मनोबल खच्ची करणे थांबवावे. जवानांच्या शौर्याचे राजकारण करण्याचा अधिकार कुणालाही नाही.

Related posts

मी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही, मात्र पक्षप्रवेश केल्याचा काँग्रेसचा दावा

News Desk

१४ जूनला होणार राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

News Desk

मध्य प्रदेशसह राजस्थानमध्ये मायावती ‘किंगमेकर’

News Desk