HW News Marathi
राजकारण

वाढदिवसा निमित्त उद्धव ठाकरेंवर राजकीय शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई | शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा आज ५८ वा वाढदिवस साजरा होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठाकरेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा असे म्हणत ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यात येत आहेत. तर, वाढदिवसानिमित्त माझे कुठेही फ्लेक्स लावू नका, मुंबईच पर्यावरण जपा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. तर राजकीय नेत्यांनी ट्विटवरवरुन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

भाजप सरकार आणि मोदींवर नेहमीच कडाडून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटवरुन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाजसेवेसाठी आपणास दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, असे ट्विट मोदींनी केले. तर राहुल गांधी यांनीही ट्विट करुन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी देखील ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपतींचा असा अपमान सहन केला जाणार नाही पवारांनी सरकारला खडसावले

News Desk

ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

Aprna

ममता बॅनर्जींची ‘ही’ याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna