HW News Marathi
राजकारण

साहेब मराठी शाळा वाचवा, विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे ‘मातोश्री’बाहेर आंदोलन 

मुंबई | मुंबई महापालिकेच्या विनाअनुदानित प्राथमिक शाळांच्या शिक्षिकांनी ‘मातोश्री’बाहेर आंदोलन केले आहे. मुंबई महापालिकेने मान्यता दिलेल्या १०४ विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे, या मागणीसाठी या शाळांच्या शिक्षकांनी ‘मातोश्री’बाहेर आंदोलन केले होते. “साहेब मराठी शाळा वाचवा”, अशी हाक यावेळी या शिक्षकांनी दिली होती. दरम्यान, शिवसेना नेते अनिल परब यांच्या चर्चा करण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. तब्बल गेले २२ दिवस आझाद मैदानावर विनाअनुदानित शाळांच्या या शिक्षकांचे आंदोलन सुरु आहे.

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बाहेर येऊन आम्हाला भेटत नाहीत तोपर्यंत आम्ही मातोश्री समोरून हटणार नाही”, असा निर्धार शिक्षकांनी केला होता. मात्र, उद्धव ठाकरे तुम्हाला भेटणार नाहीत तसेच ही आंदोलनाची जागा देखील नसल्याचे सांगत पोलिसांनी शिक्षिकांना ‘मातोश्री’बाहेरून हटवले. अखेर अनिल परब यांनी या शिक्षकांना चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. तसेच, पुढील २ दिवसांमध्ये तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र करु, असा इशारा देखील शिक्षकांकडून देण्यात आला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्या आम्ही सत्तेत आल्यास पालेकरांना आमच्यावरही टीका करण्याचा अधिकार !

News Desk

#LokSabhaElections2019 : निवडणूक लढविण्याबाबत सलमानचा मोठा खुलासा

News Desk

उमेदवारांवर पाच गुन्हे असले तरी तो जिंकणार हवा !

News Desk