HW News Marathi
राजकारण

बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही

आंध्र प्रदेश | तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या ताफ्यावर शुक्रवारी तेलगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची घटना घडली. हा प्रकार घडल्याचे कळताच तेलगू देसमचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांचा असा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही अशा शब्दात कार्यकर्त्यांना समज दिली.

बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या शहा यांच्या ताफ्यावर दगडफेक करणा-या तेलगू देसमच्या कार्यकर्त्यांनी अंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्या, अशी मागणी करीत दगडफेक केली. मात्र कार्यकर्त्यांच्या या कृत्यावर तेलगू देसमचे अध्यक्ष, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी संताप व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये. यापुढे असली बेशिस्त खपवून घेणार नाही, असा इशारा नायडू यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

INX Media Case: पी. चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत आणखी चार दिवसांनी वाढ

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे सर्वोच्च न्यायालय | संजय राऊत

News Desk

युतीनंतर सेनाभवनात शिवसेना नेत्यांची पहिली बैठक

News Desk