HW News Marathi
राजकारण

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमधून गडकरी बाहेर तर फडणवीसांना स्थान

मुंबई | भाजपने केंद्रीय निवडणूक समितीमध्ये मोठे फेरबदल केली आहे. यानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि शिवराज सिंग चौहान यांच्यासह 15 सदस्यीय केंद्रीय निवडणूक समितीमध्ये स्थान मिळालेले नाही. यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे समितीचे अध्यक्ष आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान मिळाले आहे. यामुळे फडणवीसांची दिल्लीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, यापूर्वी फडणवीसांकडे गोवा निवडणुकीची जबाबदारी सांभाळण्यासाठी दिली होती. यात फडणवीसांनी केलेल्या कामगिरीनंतर त्यांची केंद्रीय निवडणूक समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीत नवीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. यानुसार, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, सुधा यादव, इक्बाल सिंग लालपूरा, सर्बानंद सोनेवाल, के लक्ष्मण आणि सत्यनारायण जातिया यांचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक समितीमध्ये फडणवीसांसह भूपेंद्र यादव आणि ओम माथूर या दोन नव्या चेहऱ्यांना संधई दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राधाकृष्ण विखे पाटील यांना कारणे दाखवा नोटीस

News Desk

अखेर शरद यादव यांनी वसुंधरा राजेंची माफी मागितली

News Desk

इसिसने जाळे विणले कसे?

News Desk