HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादी-काँग्रेसचे आणखी १७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक !

मुंबई | राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आणखी १७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असून ते आमच्या संपर्कात असल्याचा धक्कादायक खुलासा केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी काल (१७ ऑगस्ट) औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना म्हटले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमधील ४१ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात आता राष्ट्रवादी-काँग्रेसचे असे १७ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसचे दिग्गज नेतेदेखील भाजपत प्रवेशासाठी रांगा लावून उभे आहेत. मात्र, सामाजिक समीकरण व राजकीय परिस्थिती विचारात घेऊन त्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे दानवे म्हणाले.

सध्या भाजपमध्ये इतर पक्षातील आमदारांचा प्रवेश सुरु असला तरी जन्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याची गरज नाही. पक्षात कुणी आले तरी आपले काम आपण सुरूच ठेवायचे असते. एकनाएक दिवस तुम्हाला नक्कीच न्याय मिळणार असल्याचा सल्ला दानवे यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. काश्मीरला विशेषाधिकार देणारे ३७० आणि ३५ अ हे कलम रद्द करण्यात आल्याने देशभरात भाजपबाबत विश्वासाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे आता २०२४ ची लोकसभा निवडणूक देखील कॉंग्रेसच्या हातून गेली असल्याचा टोला दानवे यांनी लगावला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी” अजित पवारांची सभागृहात मागणी

Aprna

ठाण्यातून राष्ट्रवादीचे ‘गणेश नाईक’ यांना उमेदवारी मिळणार का ?

News Desk

“सात पानापैकी चार पाने हे आम्ही यापूर्वी दिलेल्या पत्रातीलच”, देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टोला

Aprna