HW News Marathi
राजकारण

डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादीचे इंधनदरवाढी विरोधात अनोखे आंदोलन 

मुंबई । एक ही भूल कमल का फुल… इंधन दरवाढीचा निषेध असो… मोदी सरकार हाय हाय… अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डोंबिवली शहरातील उस्मा पेट्रोल पंपावर ग्राहकांना कमळाचे फूल देत अनोखे आंदोलन करत राष्ट्रवादीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांसोबत पेट्रोलपंपावर हे अनोखे आंदोलन करण्यात आले. डोंबिवली शहरातील उस्मा पेट्रोलपंपावर इंधनदरवाढीचा निषेध करत आणि मोदी सरकारच्याविरोधात घोषणाबाजी करत पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना कमळाचे फूल भेट देण्यात आले. यावेळी इंधन दरवाढीच्याविरोधात आपणही उतरावे अशी विनंती ग्राहकांना करण्यात येत होती.

यावेळी प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांच्यासोबत कल्याण-डोंबिवली जिल्हा सरचिटणीस जव्हार मेहता, राष्ट्रवादी महिला काँग्रेस कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षा सारिकाताई गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्षा विनया पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील, डोंबिवली शहर कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोस्कर, उपाध्यक्ष प्रसन्न अचलकर, सरचिटणीस जगदीश ठाकूर, कल्याण-डोंबिवली ग्रामीणचे अध्यक्ष दत्ता वझे आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#RamMandir : न्यायालयाने देशाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत !

News Desk

शिवस्मारक बांधण्याआधी खर्च वसुलीचे सरकारला कोडे

News Desk

सरकार बोलण्यात ऑनलाईन,कामात ऑफलाईन!: खा. अशोक चव्हाण

swarit