मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे उपनेते गोपीचंद पडळकर यांची पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आजपासून (२६ सप्टेंबर) वंचितचे काम थांबविणार असल्याचे सांगितले. पडळकर आमच्यासोबत असल्याचे वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. पडळकरांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते आता भाजपमध्ये जाणार का? यावर चर्चा रंगल्या आहेत.
राज्यातील फायरब्रँड नेते म्हणून गोपीचंद पडळकर यांना ओळखले जाते. धनगर समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले आहे. पडळकर हे भाजपमधील धनगर नेते म्हणून महत्त्वाच्या पदावर होते. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला होता.सांगली लोकसभा मतदारसंघातून लढताना पडळकर यांनी खानापूर आणि जत मतदारसंघात जास्त मतदान घेतले होते.
सांगली लोकसभा निवडणुकीत वंचितकडून उभे राहिलेले उमेदवार गोपीचंद पडळकर हे स्वगृही परतणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. येत्या २ दिवसांत कार्यकर्त्यांची चर्चा करून गोपीचंद पडळकर भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.