वाराणसी | देशातील पवित्र मानली जाणाऱ्या गंगा नदीतून मालवाहतूक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी-हल्दिया नॅशनल वॉटर वे -१ वरील देशातील पहिल्या मल्टी मॉडेल टर्मिनलचे उदघाटन केले. मोदींचा हा वाराणसीचा १५ वा दौरा असून या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी मोदींनी हल्दीया येथीन आलेल्या टागोर जहाजावरील कंटेनर अनलोडिंग करण्याचे कामही सुरू केले.
WATCH: PM Modi speaking at the launch of various projects in Varanasi. https://t.co/dPaTEAnWYw
— ANI (@ANI) November 12, 2018
Varanasi: Prime Minister Narendra Modi inaugurates the first multi modal terminal constructed on River Ganga pic.twitter.com/qH3eSE9fL6
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 12, 2018
पुढे मोदी असे देखील म्हणाले की, या आधीच्या सरकारने सर्व सामान्यांवर जो अन्याय केले होते. त्या अन्यायाची भरपाई करण्याचे काम आमची सरकार पुर्णपणे प्रयत्न करत आहे. या जलमार्गाचा फायदा फक्त यूपीला होणार असे नाही तर यामुळे बंगाल, झारखंड आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांना यांचा फायदा होणार आहे. या जल मार्गाचा वापर फक्त मालवाहतुकीसाठी होणार असे नाही तर या मुळे देशातील पर्यटनांला देखील चालना मिळणार आहे. तसेच या जलमार्गाद्वारे वाराणसी समावेश हा टेक्सटाइल सेक्टर होईल.
वाराणसी येथील मल्टी मॉडेल टर्मिनल २०६ कोटी रुपये खर्चुन तयार करण्यात आले आहे. या टर्मिनलची जेटी २०० मीटर लांब आणि ४५ मीटर रुंद आहे. येथे मालाचा चढ उतार करण्यासाठी जगातील अत्याधुनिक हेवी क्रेन लावण्यात आली आहे. जर्मनीत तयार केलेल्या या मोबाइल हार्बर क्रेनची किंमत २८ कोटी एवढी आहे.
Kuch der pehle maine nadi marg se pahunche desh ke pehle container vessel ka swagat kiya. Ye container vessel chalne ka matlab hai ki poorvi uttar pradesh, aur purvi bharat jalmarg se ab Bengal ki khaadi se jud gaya hai: PM Modi in Varanasi pic.twitter.com/axmanr1THb
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 12, 2018
हल्दीया जलमार्ग सुरू झाल्याने सागरमाला प्रोजेक्टद्वारे भारत दक्षिण आशियातील व्यापारामध्ये चीनप्रमाणे भारताचे दमदार उपस्थिती दर्शवण्यात सक्षम होणार आहे. वाराणसी – हल्दीया जलमार्गामुळे गंगेच्या मार्गातून व्यापार वाढून रामनगर टर्मिनलद्वारे उत्तर भारताला पूर्व आणि पूर्वोत्तर भारताशी तसेच बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि अन्य दक्षिण आशियाई देशांशी जोडणे शक्य होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.