HW News Marathi
राजकारण

Bhima Koregaon Case : वरवर राव यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पुणे | अर्बन नक्सलचा आरोपावरून एक्टिविस्ट वरवर राव यांना रविवारी दुपारी (१८ नोव्हेंबर)ला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासमध्ये नक्षवादी कारवायांमध्ये राव यांचा सहभाग होता. तसेच नक्षलवाद्यांची संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने न्यायालयाने २६ नोव्हेंबरपर्यंत राव यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी राव यांना शनिवार (१७ नोव्हेंबर)ला हैदराबादमधील त्यांच्या घरातून अटक करण्यात आले होते.

तसेच राव हे भूमिगत असलेल्या माओवादी नेता गणपतीच्या संपर्कात होते. मणिपूर आणि नेपाळ येथून हत्यारे आणण्याचा कट ही रचला गेला. राव यांची नजरकैदचा कालावधी शनिवारी (१७ नोव्हेंबर)ला संपला आहे. तसेच राव यांनी हैदराबाद कोर्टाने त्यांचा जामीना अर्ज याचिका फेटाळून लावल्यामुळे अटक करण्यात आले. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी २८ ऑगस्टला देशातील विविध राज्यातील पाच विचारवंतान “अर्बन नक्सल”चा आरोप ठेवत यांना अटक करण्यात आले होते. पुणे पोलिसांनी वरवर राव यांच्या व्यतिरिक्त अरुण फरेरा, वर्नान गोन्साल्विस, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा यांना अटक करण्यात आले होते. या पाचही जणांना नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिशीर शिंदेंचा शिवसेनेत प्रवेश

News Desk

एमएमआरडीएचा विस्तार होणार, राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk

फैजाबादनंतर आता अहमदाबादचे नामांतर ‘कर्णावती’ होणार का?

News Desk