HW News Marathi
राजकारण

#Results2018 : वसुंधरा राजे जिंकल्या, भाजप हारले

नवी दिल्ली | गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा यावेळीही कायम राहिली आहे. राजस्थानमध्ये दर निवडणूकांमध्ये सत्ता पालट होत असते. हिच परंपरा कायम राहिलेली आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे या विजयी झाल्या आहेत. राजस्थानमधील झालरपाटन मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवत २७ हजार ९२ मतांनी विजय मिळला आहे.

तसेच भाजपाचे सरकार राजस्थानमध्ये कायम राखण्यात त्यांना अपयश आले आहे. काँग्रेसकडून अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांनी सत्ता काबीज करण्यासाठी कसून परिश्रम घेतले होते. त्या प्रयत्नांना यश आले आहे. गेल्या वीस वर्षांत कुठल्याच पक्षाला राजस्थानमध्ये सलग दोन टर्म सत्ता काय राखता आलेली नाही. काँग्रेस आणि भाजप यांची राजस्थानात आलटून पालटून सत्ता येत असते. ही परंपरा मोडून काढण्याची संधी वसुंधरा राजे यांनी गमावली.

राजस्थानमध्ये विधानसभेच्या २०० जागा असून १९९ जागांसाठी मतदान झाले. राजस्थानात बहुमताचा आकडा १०१ आहे. तर कॉंग्रेसने १०४ जागा पटकावल्या आहे. राजस्थानमध्ये कॉंग्रेसचीच सत्ता येणार असल्याच कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी म्हटलयो

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#LokSabhaElections2019 : …आता दुसरी परीक्षा तुमची आहे दानवे !

News Desk

राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य

News Desk

शिवसेना आमदार विजय औटी यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड

News Desk
क्राइम

१० रुपयाचे नाणे गिळल्याने चिमुकलीचा मृत्यू

swarit

नाशिक | साडेचार वर्षाच्या चिमुकलीने १० रुपयाचे नाणे गिळल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शालिनी हांडगे असे या चिमुकलीचे नाव असून आईने खाउ आणण्यासाठी १० रुपयाचे नाणे दिले होते. रविवारी शालिनी अंगणात खेळता खेळता तिने नाणे गिळले असून त्यानंतर ती झोपी गेली.

पण, शालिनीला अचानक त्रास होऊ लागल्याने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. शालिनीवर उपचार सुरु करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू असून उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे.

Related posts

httpstwitter-commahabatmi1

News Desk

3 लाख चोरी करणारे आरोपी अटक

News Desk

पासपोर्ट डिस्पॅच करण्याच्या नावाखाली अभिनेते धर्मेश व्यास यांची फसवणूक; ओशिवरा सायबर सेल पुन्हा अॅक्शन मोडवर

Chetan Kirdat