HW News Marathi
राजकारण

आपले राजकीय मतभेद असतील पण आम्ही सूडाने वागणारे नाही !

मुंबई | “आपले राजकीय मतभेद असतील पण सूडाने वागणारे आम्ही नाही. आम्ही कोणाहीसोबत सुडाने वागत नाही. मी आणि मुख्यमंत्री तुम्हाला शब्द देतो कि आम्ही तुमच्याशी सुडाने वागणार नाही”, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बोलत होते. माथाडी कामगारांचा मेळावा आणि माजी आमदार अण्णासाहेब पाटील यांची ८६ व्या जयंतीनिमित्त बुधवारी (२५ सप्टेंबर) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित होते.

शरद पवारांविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीच्या समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांचा याचा तीव्र निषेध व्यक्त केला. त्याचप्रमाणे, आगामी विधानसभेच्या तोंडावर शरद पवार यांच्यावर सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपच्या अन्य नेत्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी देखील आम्ही तुमच्याशी सूडबुद्धीने वागणार नाही, असे आश्वासन शरद पवार यांना दिले आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते ?

शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी कारवाईमध्ये कोणतेही राजकारण नाही. सरकारकडून कोणावरही सूडबुद्धीने कारवाई करण्यात आलेली नाही”, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. “जे दोषी असतील त्यांच्यावरच कारवाई होईल”, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. दरम्यान, आगामी विधानसभेच्या तोंडावर शरद पवार, अजित पवार यांच्यावर होणाऱ्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला काँग्रेसला मात्र मोठा धक्का बसला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहशतवाद आणि आर्थिक गुन्हे हे जगासमोरील दोन सर्वांत मोठे धोके !

News Desk

अण्णासाहेब मायकर व्हायरल ऑडिओ क्लीपवर विनायक मेटेंच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया

Aprna

लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा थेट मंत्रालयावर धडकणार !

News Desk