HW News Marathi
राजकारण

जाणून घ्या…’भारत जोडो यात्रे’ने महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ?

मुंबई | काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रातला आजचा शेवटचा दिवस आहे. ७ नोव्हेंबर रोजी ही यात्रा तेलंगणामधून महाराष्ट्रात आली. त्यानंतर नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला आणि आता बुलढाणा अश्या ५ जिल्ह्यातून पादाक्रांत करत संपन्न झाली. या १०-१२ दिवसात राहुल गांधी (Rahul Gandhi) समाजातील अनेक घटकांना भेटले, त्यांच्याशी बातचीत केली. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे, ही काँग्रेसची (Congres) रॅली जरी असली तरी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याशिवाय महाविकास आघाडीचे नेतेही या यात्रेत सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस नेते रोहित पवार  शिवसेनेचे नेता आदित्य ठाकरे, सचिनआहिर यांनी या यात्रेत सहभागी होऊन महाविकास आघाडीचा पाठींबा यात्रेला दर्शवला. ही यात्रा २ टप्प्यात पार पडली. यात्रेचा पहिला टप्पा HW News च्या टीमने आणि मी स्वतः कव्हर केला होते. त्यामुळे आज यात्रेच्या शेवटच्या दिवशी नक्की राहुल गांधींनी आणि काँग्रेसने या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रात काय साध्य केले या विषयाबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्याचबरोबर भारत जोडो यात्रेतील काही निरीक्षणे सुद्धा या व्हिडिओतून आम्ही मांडणार आहोत.

 

काँग्रेसचे मीडिया डिपार्टमेंट प्रमुख जयराम रमेश याना यात्रेदरम्यान एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारलेला की, या यात्रेचा उद्देश निवडणूक जिंकणे नाही तर या यात्रेचे यश तुम्ही कश्या प्रकारे मोजमाप कराल? त्यावेळी त्यांनी उत्तर देताना म्हटले की यात्रेचा उद्धेश जरी इलेक्टोरल म्हणजे निवडणूक जिंकणे नसला तरी ही यात्रा पोलिटिकल नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. ही यात्रा इलेक्टोरल नसली तरी राजनीतिक आहे. आणि त्यामुळेच या यात्रेने महाराष्ट्रात ५ राजनीतिक ध्येय साध्य केलेत असे म्हणता येईल.

महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना एका मंचावर आणणे

ही यात्रा सुरु व्हायच्या आधी, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बऱ्याच कारणावरून अंतर्गत वाद असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जिल्हा निवडणुकीतील उमेदवारीमुळे नाराजीचे सूर असल्याची चर्चा देखील गेल्या वर्षी झाली होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे नाराज आहेत आणि यात्रेच्या दरम्यान पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील अशाही बातम्या येत होत्या. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी तर यात्रेच्या दुसऱ्या टप्प्या आधी २ टप्पे पडतील असे वक्तव्य केले होते. पण, अशा सर्व बातम्यांचे खंडन कारतकारात महाराष्ट्र काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते या यात्रेत एकत्र दिसले. अशोक चव्हाण, नाना पाटोळे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे असे काँग्रेसचे मातब्बर नेतेमंडळी नांदेड ते बुलढाणापर्यंत एकाच मंचावर दिसले. त्यामुळे काँग्रेसमधल्या अंतर्गत वादाच्या चर्चाना कुठेतरी ब्रेक लागला. आणि आम्ही सर्व एकत्र आहोत असा मेसेंज यातून गेल्याचे दिसते.

२. विदर्भ-मराठवाड्यात काँग्रेसचा माहोल तयार करणे

जर तुम्ही या यात्रेचा मार्ग बघाल, तर ही यात्रा नांदेड, हिंगोली, वाशीम अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातून जाते. हे सर्व जिल्हे विदर्भ आणि मराठवाड्यात येतात. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले होते. त्यापैकी १७ आमदार हे विदर्भातून निवडून आलेले आहेत. शिवाय नांदेड, लातूर हे काँग्रेसचे बालेकिल्ले आहेतच. यात्रेचा दुसरा टप्पा विदर्भातल्या बुलढाण्यात संपन्न झाला. बुलढाणा हा २०१४ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा आणि विदर्भाच्या दृष्टीने सुद्धा याचे महत्व खूप आहे. शेगाव च्या विराट जनसभेतून काँग्रेसने विदर्भात मेसेज देण्याचाही प्रयत्न केलेला दिसतो. निवडणुकीच्या दृष्टीने विदर्भ महत्त्वाचा प्रदेश आहे. कारण, या प्रदेशात ६० पेक्षा जास्त विधानसभाच्या जागा आहेत.

३. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

काँग्रेसवर सतत अशी टीका होत असते की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नाहीये. जिंकण्याची भूक, किंवा जिद्द नाहीये. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एक प्रकारची अनिश्चितता आणि मरगळ आली आहे. पण या यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसला. अनेक कार्यकर्ते स्वखर्चाने या यात्रेत सहभागी होण्यासाठी आले होते. विशेषतः राहुल गांधींच्या येण्याने राज्यातले नेते जे कधी जिल्ह्यातून फिरताना गाडीतून बाहेरही पडत नाहीत ते पायी चालत होते आणि कार्यकर्त्यांना भेटत होते. यामुळे कार्यकर्तेही उत्सफूर्तपणे यात्रेत सहभाग घेत होते.

४. युवा नेत्यांना संधी

या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसच्या युवा नेतृत्वाला आपली शक्ती आणि सामर्थ्य दाखवायची संधी मिळाली. कोल्हापूरचे सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम, यांच्या नेतृत्वात ७००० कार्यकर्ते, काँग्रेस समर्थक या यात्रेत सहभागी झाले. नांदेडमधून यात्रा जेव्हा हिंगोलीमध्ये आली तेव्हा, यात्रेच्या स्वागतासाठी भव्य तयारी करण्यात आली होती. याची जबाबदारी लातूरचे देशमुख बंधूंकडे होती. काँग्रेसच्या नव्या फळीतील नेते नांदेडपासून ते बुलढाणा पर्यंत राहुल गांधींच्या सोबत दिसले. यात्रेच्या नियोजनातील अनेक कामे या नेत्यांनी वाटून घेतली होती. त्यामुळे या यात्रेच्या निमित्ताने त्यानंही आपले बळ किलती आहे हे दाखवायची संधी मिळाली.

५. राहुल गांधींची बदललेली ईमेज 

राहुल गांधींवर याआधी भाजपकडून सतत टीका केली जायची की ते दुर्गम आहेत. कार्यकर्ते आणि नेत्यांना भेटत नाहीत. ते ज्येष्ठ नेते  नाहीत अशी टीकाही त्यांच्यावर व्हायची. पण, या यात्रेच्या माध्यमातून हा शिक्का पुसून टाकण्याचे काम नाक्कीच सध्या झाले आहे. राहुल स्वतः रोज सकाळी ४ वाजता उठून पदयात्रेला ५ वाजेपर्यंत सुरुवात करतात आणि रोज जवळ जवळ २५ किलोमीटर चालतात. ही पदयात्रा त्यामुळे सोप्पी तर नक्कीच नाही. पण, राहुल गांधी हे रोज करत आहे आणि पदयात्रेला येणाऱ्या समर्थकांना सुद्धा हे जाणवत आहे, असे आम्हाला दिसले.

 अशा काही गोष्टी आहेत ज्या भारत जोडो यात्रेने महाराष्ट्रात साध्य केल्या. पण याशिवाय काही निरीक्षणेसुद्धा आहेत.

१. सर्वात आधी म्हणजे ही यात्रा जशी दिसते तशी नाहीये. यात्रेच्या माध्यमातून राहुल नक्कीच समाजातल्या विविध घटकांशी संवाद साधत आहेत पण राहुल कोणाशी संवाद साधणार, कोण राहुल गांधींपर्यंत येऊ शकते, भेटू शकते यासाठी सुद्धा एक फिल्टर आहे. राहुल गांधींच्या टीम मधली माणसे, गर्दीतून अशा काही माणसांना शोधतात आणि त्यांना राहुल गांधींपर्यंत आणतात. पण यामागे कारण सुरक्षेचेही दिले जाते. राहुल गांधी यांची स्वतःची सुरक्षा टीम, राज्य पोलीस यांचा एक सुरक्षा घेरा त्यांच्याभोवती सतत असतो आणि त्यामळे राहुल गांधींचे लोकांशी परस्परसंवाद याला मर्यादा येतात.

२. भारत जोडो यात्रा एक यात्रेपेक्षा जास्त चालता फिरता इव्हेंट आहे असे ही यात्रा जवळून पाहिल्यावर जाणवते. यात्रेत बऱ्याच गोष्टी नियोजित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केल्या जातात. यात्रा कुठी थांबणार, भारत यात्रींचे तंबू कुठे उभारण्यात येणार, जेवण्याची व्यवस्था सगळे नियोजनबद्ध पद्धतीने केले जाते. पण याकडे आपण दुसऱ्या पद्धतीने पण पाहू शकतो: साधारणपणे काँग्रेसला इव्हेंट करता येत नाही असा समाज प्रचलित आहे. हे पेरसेप्टिव खोदून काढण्यात या यात्रेला यश आलेले आहे. नांदेड मधली सभा असो किव्वा कालची शेगाव मधली सभा, काँग्रेस ला सुद्धा भाजपच्या तोडीस तोड असा इव्हेंट करता येतो असा दाखवण्याचा प्रयत्न यातून केलेला दिसतो.

३. सिम्बॉलिसम या यात्रेत भरपूर सिम्बॉलिसम आहे. पहिल्याच दिवशी राहुल गांधी महाराष्ट्रात आले तेव्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून मग त्यांनी यात्रा सुरु केली. त्याच दिवशी मध्यरात्री ते गुरुद्वारा मध्ये गेले. यात्रेत त्यांनी केसरी टोपी घातलेली दिसली, धनगर समाजाचे प्रतीक असलेले काठी आणि घोंगडे हे घेऊन चालताना सुद्धा ते दिसले, शेगाव ला त्यांनी गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, रांगेत उभे राहून महाप्रसाद घेतला, संध्याकाळच्या सभेत जिजाऊंचे नाव घेतले , अश्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉलिसम या  यात्रेत होते.

याशिवाय राहुल गांधींचा कॉन्फिडन्स वाढला आहे हे त्यांच्या बोलण्यातूनही जाणवून येते. पण यात्रा जरी वरील सर्व गोष्टी साधण्यात यशस्वी झाली असली तरी यात्रेनंतर हे सर्व टिकून राहील कि नाही याबद्दल साशंकता राहिलाच. पण त्याचे उत्तर येणार काळच देईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्हाला जनतेने राज्य दिले, आता मंत्रिमंडळ विस्तार तरी करा !

News Desk

अरुण गवळीला हवी २८ दिवसांची संचित रजा

News Desk

राजीनामा देण्यासाठी आरबीआय गव्हर्नर यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव ?

swarit