HW News Marathi
राजकारण

आजच्या तारखेला निवडणुका झाल्या तर काय असेल भाजपची स्थिती ?

नवी दिल्ली | आजच्या घडीला जर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या तर मध्य प्रदेश, आणि राजस्थानमध्ये भाजपचा पराभव होईल. त्याचप्रमाणे छत्तीसगडमध्येही भाजपची निराशाच होण्याची शक्यता आहे, एबीपी न्यूज आणि सी वोटर्स यांच्या सर्वेक्षणातून करण्यात आला आहे.

आजच्या तारखेला जर मध्यप्रदेशात निवडणूक झाल्या तर मध्य प्रदेशातील एकूण २३० जागांपैकी काँग्रेसला ११९ म्हणजेच बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या जागांपेक्षा ३ जागा जास्त मिळतील. तर भाजपला मात्र मध्यप्रदेशात १०५ जागांवरच समाधान मानावे लागणार आहे. तर येथील इतर पक्षांना सहा जागा मिळतील, असे एबीपी न्यूज आणि सी वोटर्स यांच्या सर्वेक्षणातून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे छत्तीसगडमध्ये देखील भाजपची स्थिती फारशी चांगली नसेल, अशी माहिती या सर्वेक्षणातून मिळत आहे.

राजस्थानमध्ये एकूण २०० जागांसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे. एबीपी न्यूज आणि सी वोटर्स यांच्या सर्वेक्षणानुसार, काँग्रेस राजस्थानमध्ये सर्वात जास्त १४४ जागा मिळवून विजयी होऊ शकते तर भाजपला केवळ ५५ जागांवर समाधान मानावे लागेल. तर राजस्थानमधील एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून येईल, असे एबीपी न्यूज आणि सी वोटर्स यांच्या सर्वेक्षणातून सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उदयनराजे भोसले आज ‘खासदारकी’चा देणार राजीनामा

News Desk

Raj Thackeray ED Live Updates : साडेआठ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे बाहेर

News Desk

महात्मा ज्योतिबा फुले यांचे ‘शेतकऱ्यांचे आसूड’ हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल! – उद्धव ठाकरे

Manasi Devkar
देश / विदेश

सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात घट

swarit

मुंबई सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल ४० पैशांनी तर डिझेलच्या दरातही ३७ पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी ८५.९५ रुपये तर डिझेलसाठी ७७.९६ रुपये मोजावे लागणार आहेत.गेल्या दहा दिवसांपासून देशभरात इंधनाच्या दरात घट होत आहे. दिल्लीतही इंधनाचे दर घटले आहेत.

दिल्लीमध्ये पेट्रोल ४० पैशांनी स्वस्त तर, डिझेल ३५ पैशांनी स्वस्त झाले आहे. आता दिल्लीकरांना पेट्रोलसाठी ८०.४० रुपये मोजावे लागणार आहे ,तर डिझेलसाठी ७४.३८ रुपये मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून काही डॉलरमध्ये उतरत असताना देशातील इंधनाचे दर काही पैशांमध्ये उतरविण्यात येत आहेत.गेल्या दहा दिवसांपासून देशभरात इंधनाच्या दरात घट होत असल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होत असल्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Related posts

आता अ‍ॅमेझोनही देणार यूपीआय सुविधा

News Desk

ठाणे आणि दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला अधिक गती! – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Aprna

अखेर कर्नाटकच्या राजकीय नाट्यावर पडदा, बी एस येडियुरप्पांचा राजीनामा

News Desk