HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, तर गरिबांना महिन्याला ६००० देणार !

माजलगाव | देशात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन आम्ही जाहीरनाम्यात दिले आहे. मोदी सरकारने वर्षभरात ६००० रुपये देण्याची फसवी घोषणा केली. आम्ही मात्र या देशातील गरिबाला दर महिन्याला ६००० रुपये याप्रमाणे वर्षाला ७२,००० रुपये देऊ. त्यासाठी आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना विजयी करा”, असे आवाहन विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.

फडणवीस सरकारने केलेली कर्जमाफी फसवी निघाली. एकाही शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला नाही. आम्ही मात्र देशात आघाडीचे सरकार आले तर या देशातील प्रत्येक शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत मोदी सरकारने निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये देण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा केवळ निवडणुकीसाठी आणि मते मिळवण्यासाठी आहे. अनेक ठिकाणी दिलेले २००० रुपये काढून घेतले. ते निवडणूक झाली की योजना बंद करतील. आम्ही मात्र देशातील गरिबाला वर्षाला ७२,००० रुपये याप्रमाणे महिन्याला ६००० रुपये देणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जातीवर नव्हे विकासावर बोला, असे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले कि, “मुख्यमंत्री महोदय हा सल्ला तुमच्या उमेदवार आणि पालकमंत्र्यांना द्या. बोलण्यासारखा कोणताही विकासाचा मुद्दा नसल्यानेच त्या फक्त जातीयवादावर बोलत आहेत.”

Related posts

ठाकरे चित्रपट ‘बेस्ट’, गाणी ‘बेस्ट’ म्हणत संजय राऊत यांची मुख्य प्रश्नाला बगल

News Desk

मायावती एका उमेदवारीसाठी १५ कोटी रुपये घेतात, हा त्यांचा उद्योगच !

News Desk

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

News Desk