HW News Marathi
राजकारण

“सुषमा अंधारे कोण?”, असा सवाल करत प्रताप सरनाईकांची टीका

मुंबई | “सुषमा अंधारे कोण आहेत?, त्यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला आणि आज बोललत आहेत,” अशी बोचरी टीका शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी  केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रवक्ते सुषमा अंधारे (Sushma Andhare) या वारंवार शिंदे गटावर टीका करत आहे. या पार्श्वभूमीवर सरनाईकांनी अंधारेंना लक्ष केले.

 

प्रताप सरनाईक म्हणाले, “मला लोकांची विकास कामे करायची आहेत या सुषमा अंधारे कोण?, ज्यांनी काल पक्षात प्रवेश केला आणि त्या आज बोलत आहेत. पक्षात येण्यापूर्वी अंधारेंनी अनेक वेळा शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका केली होती.” सरनाईक पुढे म्हणाले, “याआधी आपला इतिहास पहावा, अशी एखादी व्यक्ती मीरा-भाईंदर शहरात येऊन काहीही बोलत असेल तर तेचुकीचे आहे. आपण इथपर्यंत कशा पोहोचलात आणि आपण कोणाबद्दल बोलत आहात. याबद्दल आधी अंधारेंनी विचार करायला हवे”, असे सरनाईकांनी म्हटले.

 

दसरा मेळाव्यातील भाषणातून शिंदे गटावर टीका केली होती. यावेळी सुषमा अंधारे यांच्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली होती. यानंतर सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेची पहिली सभा आठवड्याभरापूर्वी ठाण्यात पार पडली होती. या सभेदरम्यान सुषमा अंधारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केली. तर शिंदे गटावर टीका केली होती. यानंतर सभेतील सुषमा अंधारे यांच्यासह पाच जणांवर ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी पाच नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यात सुषमा अंधारेंवर शिंदे गटाचे सरनाईकांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा : सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

News Desk

‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेचा ५६% निधी प्रसिद्धीवर खर्च

News Desk

#LokSabhaElections2019 : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk