HW Marathi
राजकारण

काँग्रेस नेत्याचे चिथावणीखोर वक्तव्य, भर कार्यक्रमात पंतप्रधानांची हत्या करण्याचे आवाहन

नवी दिल्ली | कर्नाटक काँग्रेसच्या एका नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदीबद्दल चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. या नेत्याने एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदींवर टीका करताना चक्क पंतप्रधानांची हत्या करण्याचे आवाहन तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांना केले आहे. बेलूर गोपालकृष्णन असे या काँग्रेस नेत्याचे नाव असून त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकरणी कर्नाटक भाजपने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

मुख्य म्हणजे गेल्या वर्षीच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांपर्यंत भाजपमध्ये असणाऱ्या बेलूर गोपालकृष्णन यांनी नाराज होऊन निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. “एका नेत्याचे अशाप्रकारे लोकांना देशाच्या पंतप्रधानांची हत्या करण्याचे आवाहन करणे, हे अत्यंत धोकादायक आहे. कर्नाटकचे गृहमंत्रालय आणि बंगळुरूचे पोलीस आयुक्त यांनी याबाबत तात्काळ कारवाई करावी”, अशी मागणी करणारे ट्विट कर्नाटक भाजपने केले आहे. या ट्विटसह काँग्रेस नेत्याच्या बेताल वक्तव्याचा व्हिडीओ देखील जोडण्यात आला आहे.

Related posts

मोदी सरकारच्या आधारसक्तीचा ‘परीघ’ कमी झाला | ठाकरे

News Desk

भाजपाच्या संपर्क फॉर समर्थनवर धनंजय मुंडेची टीका

News Desk

गुगलवर राहुल गांधी सरस, अमित शहांना टाकले मागे

News Desk