HW News Marathi
राजकारण

कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी येडियुरप्पांची आज अग्निपरीक्षा

बंगळुरु | कर्नाटक विधानसभा निवडणुकी नंतर मुख्यमंत्री पद कुणाकडे रहाणार यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या सुनावणीत शनिवारी चार वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षांना अवधी दिला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या झटक्यानंतर खरंच येडियुरप्पा शनिवार आज दुपारी ४ वाजता बहुमत सिद्ध करणार का हे येत्या थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांपैकी २२२ जागांवर निवडणूक झाली आहे. या निवडणूकीत भाजपला १०४, काँग्रेसला ७८, जेडीएस ३८ आणि अन्य २ जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा ११२ इतका आहे. मात्र सध्या भाजपकडे १०४ आणि एक अपक्ष असे एकूण १०५ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपला अजूनही ७ जागा कमी पडत आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानुसार भाजप आज बहुमत कसे सिद्ध करणार हे पहाणे येत्या काळात औत्सुक्याचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुख्यमंत्र्यांसोबत जाऊन बच्चू कडू यांनी स्वाभिमान गहाण ठेवला”, सुषमा अंधारेंची टीका

Aprna

मायावती एका उमेदवारीसाठी १५ कोटी रुपये घेतात, हा त्यांचा उद्योगच !

News Desk

काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची जागा ही जन्मापासूनच आरक्षित !

News Desk