HW News Marathi
राजकारण

पार्थ प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

रामती | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू आणि अजित पवार पुत्र पार्थ पवार यांना जाहीर फटकारल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या. त्यातच यावर अजित पवार यांची भूमिका काय असणार याविषयी उत्सुकता लागली आहे. मात्र, बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवारविषयी बोलण्यास नकार दिला आहे. “मला कुणाशीही काही बोलायचं नाही. मला माझं काम करायचं आहे”, असे म्हणत अजित पवारांनी यावर भाष्य करणे टाळले आहे.


अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. तसेच, “मला कुणाशीही काही बोलायचं नाही. मला माझं काम करायचं आहे. मी सकाळी सकाळी या अधिकाऱ्यांना इकडे आणले आहे”, असे म्हणत अजित पवारांनी पार्थ पवार प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.अजित पवार हे आज (१६ ऑगस्ट) बारामती दौऱ्यावर असून ते विविध विकास कामांची पाहणी करत आहेत. बारामती मतदारसंघातील विकासकामांची पाहणी करणे आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अजित पवार बारामतीत आहेत.

विशेष म्हणजे पार्थ पवार प्रकरणानंतर अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, काल (१५ ऑगस्ट) पार्थ पवार एकटेच काका श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवारांच्या भेटीला गेले होते. पवार कुटूंबियांकडून पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकीकडे आज अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे शरद पवार देखील बारामतीत दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे, पवार कुटुंबातील वाद शमणार का ? हा प्रश्न आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंची घेणार भेट

Aprna

आपल्याकडचा इतिहास हा कोणी मराठ्यांनी किंवा ब्राम्हणांनी लिहिलेला नाही! – राज ठाकरे

Aprna

ममता या पश्चिम बंगालची संस्कृती, लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत !

News Desk