HW News Marathi
राजकारण

हिंदुस्थान कोरोनाविरोधात ‘भाभीजी पापड’ लाटत बसला आणि तिकडे रशियाने कोरोनावर ‘लस’ बनवून बाजारात आणली

मुंबई | मुंबईप्रमाणे कोरोनाचे रुग्ण आणि वाढता प्रादुर्भाव दिल्लीत आहे, पण घरात किती काळ बसून राहायचे म्हणून कामधंद्यासाठी लोक बाहेर पडले आहेत. दिल्लीतील अनेक केंद्रीय मंत्री व मोठे अधिकारी कोरोनाचे रुग्ण आहेत. अमित शहा यांच्यासह केंद्रातले सहा मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडले. हिंदुस्थान कोरोनाविरोधात ‘भाभीजी पापड’ लाटत बसला आणि तिकडे रशियाने कोरोनावर ‘लस’ बनवून बाजारात आणली. जागतिक आरोग्य संघटनेलाही त्याबाबत विचारले नाही. याला म्हणतात महासत्ता! आम्ही आमच्या मस्तीत आहोत असा टोला खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला लगावला आहे.

संजय राऊत यांनी रोखठोक भूमिकेत म्हटलं की, राष्ट्रातील संकटकाळात आम्हीच आमचे निर्णय घेऊ, जगाने नाक खुपसू नये असे बेदरकारपणे वागणाऱ्या रशियाचा आदर्श आमचे राजकारणी ठेवणार नाहीत. आजही ते अमेरिकेच्या प्रेमात पागल झाले आहेत. रशियाने बनवलेली ‘लस’ बेकायदेशीर ठरवण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर सुरू झाले आहेत, पण रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी ही लस सर्वप्रथम आपल्या तरुण मुलींनाच टोचली व आपल्या देशात आत्मविश्वास निर्माण केला. आत्मनिर्भरतेचा हा पहिला धडा रशियाने घालून दिला. आपण आत्मनिर्भरतेवर प्रवचनेच झोडत बसलो आहोत असा चिमटा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काढला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळविण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचा सौदा”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Aprna

महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि राहणार !

News Desk

राज्य सरकार सीमा भागातील जनतेच्या पाठीशी ठाम! – मुख्यमंत्री

Aprna