जकार्ता | महाराष्ट्राच्या राही सरनोबत हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णभेट दिली आहे. राहीने २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेले हे चौथे सुवर्णपदक आहे. तर राहीचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे पहिलेच सुवर्णपदक असून तिने नवा इतिहास रचला आहे. पात्रता फेरीत फारशी उत्तम कामगिरी करता न आलेल्या राहीने अंतिम सामन्यात मात्र कोणतीही कसर सोडली नाही.
#TeamIndia at the #AsianGames2018
Welcome home Gold No. 4!! 🥇🇮🇳 #RahiSarnobat in the 2nd decider shoot-off claims victory with a Games Record in the Women's 25m Air Pistol Finals. #ManuBhaker finished 6th. Bravo #RahiSarnobat winning India's 11th medal👏👏🇮🇳#IAmTeamIndia pic.twitter.com/JeZsR7COGQ— Team India (@WeAreTeamIndia) August 22, 2018
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर एअर पिस्तूल प्रकारात राहीला सुरुवातीपासूनच थायलंडच्या यांगपाबूनचे कडवे आव्हान होते. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल याचा अंदाज लावणे कठीण झाले होते आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी राही सरनोबत ही पहिली भारतीय महिला शुटर ठरली आहे. परंतु भारताची स्टार नेमबाज मनू भाकर ही पदक पटकावण्यात अपयशी ठरली.
संबंधित बातम्या
आशियाई क्रीडा स्पर्धेचे आज शानदार उद्घाटन
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.