HW News Marathi
क्रीडा

आशियाई क्रीडा स्पर्धेचे आज शानदार उद्घाटन

इंडोनेशिया | आशियाई खंडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज शानदार उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. यंदाचे हे १८वे वर्ष आहे.

इंडोनेशिया १९६२ नंतर दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करत आहे. २ सप्टेंबरपर्यंत चालणार्‍या या क्रीडा स्पर्धेत ४५ देशांचे १० हजार पेक्षा जास्त खेळाडू, पदाधिकारी, पंच सहभागी होणार आहेत. ३९ विविध खेळांच्या स्पर्धा, शर्यती आशियाई स्पर्धेत रंगणार आहेत.

या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच 2 शहरामध्ये या स्पर्धेतील सामने होणार आहे. जाकार्ता आणि पॅलमबॅग या दोन शहरात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन आणि समारोप सोहळा गेरोला बुंग कॅरोना स्टेडियममध्ये होणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात इंडोनेशियाच्या जुन्या आणि नव्या पारंपरिक शैलीचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या सोहळ्यात इंडोनेशियाचा आतापर्यंतचा देश स्वतंत्र झाल्यापासूनचा इतिहास देखील दाखवण्यात येईल. इंडोनेशियाचे दिग्गज कलाकार आणि खेळाडू उद्घाटन सोहळ्यात सामील होणार आहेत. एनर्जी ऑफ एशिया ही यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेची थीम तयार करण्यात आली आहे. क्रिकेट सॉम्बो सिरफिंग या खेळाना यंदा वगळण्यात आले आहे. तर मार्शल आर्ट खेळाचा प्रथम समावेश करण्यात आला आहे.

१९९१ साली सर्व प्रथम दिल्लीमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या यजमान पदाची जबाबादारी अगोदर व्हियतनाम देशाला देण्यात आली होती. पण आर्थिक टंचाईमुळे व्हियतनामची अर्थव्यवस्था ढासळली असल्यामुळे व्हियतनामने आयोजन पदातून अखेर माघार घेतली. मग शेवटच्या क्षणी इंडोनेशियाने आपण यजमान पद भूषवत असल्याचे आशियाई कौन्सिलला सांगितले. या स्पर्धेवर अर्थातच बलाढ्य चीन संघाचे वर्चस्व राहिले आहे. सर्वाधिक पदके चीनच्या खेळाडूंनी आतापर्यत जिंकली आहेत. चीननंतर जपान, कोरिया, इंडोनेशिया, भारत आणि फिलिपाइन्सचे वर्चस्व या स्पर्धेवर राहिले आहे. भारताचे ५०० पेक्षा जास्त खेळाडूंचे पथक यंदा या स्पर्धेत भाग घेत आहेत. उद्घाटन सोहळ्यात भारतीय संघाचे नेतृत्व युवा अ‍ॅथलेट नीरज चोप्राकडे देण्यात आले आहे. तो उदघाटन सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक असेल. चीनने आतापर्यंत या स्पर्धेत एकूण २८९५ पदके जिंकली आहेत. त्यानंतर जपान दुसरा, दक्षिण कोरिया तिसर्‍या आणि भारत चौथ्या क्रमांकावर आहे. २०१४ च्या या स्पर्धेत भारताने ५७ पदके जिंकली होती. पदके तालिके भारतीय संघ ८ व्या क्रमांकावर होता. भारताने २०१० मध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी करताना ६५ पदकांची कमाई केली होती. ही कामगिरी भारत यंदा मागे टाकणार का? याकडे तमाम भारतीय क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मणिपूरमधील शेतकऱ्याच्या मुलाने पटकावले पहिले सुवर्णपदक

Gauri Tilekar

“एकीकडे क्रिकेटचा अन् दुसरीकडे दहशतवाद्यांचा खेळ हे चालू शकत नाही”- रामदेव बाबा

News Desk

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी

swarit