जकार्ता | भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिले पदक मिळाले आहे. भारताने नेमबाज अपूर्वी चंदेला आणि रवी कुमारने स्पर्धेत पहिल्याच दिवशी पदक मिळविले आहे. या जोडीने १० मीटर एअर रायफल मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदाकाची कमाई केली आहे.
#AsianGames2018:Apurvi Chandela – Ravi Kumar win bronze medal in 10m Air Rifle Mixed Team event. pic.twitter.com/vLxaZqxY27
— ANI (@ANI) August 19, 2018
अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार या जोडीने ४२९.९ गुणांची नोंद करत स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कांस्य पदक पटकविले. चीन तैपेईच्या लीन यींगशीन आणि लू शा ओचुआन जोडीने ४९४.१ गुण मिळवून सुवर्ण मिळविले.
भारतीय महिला कबड्डी टीमने रविवारी जकार्तात १८व्या आशियाई स्पर्धेमध्ये आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली. भारतीय टीमने ग्रुप-एमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात जपानला ४३ -१२ ने पराभूत केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.