HW News Marathi
क्रीडा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे ‘किटअप’ चॅलेंज

मुंबई | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी भावी पिढीत खेळाची आवड निर्माण करण्यासाठी ‘किटअप’ चॅलेंज नावाची मोहीम सुरू केली आहे. यासाठी सचिनने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून अनेक खेळाडूना हे चॅलेंज दिले आहे.

क्रिकेटर विराट कोहली, फुटबॉलपटू संदेश झिंगन, हॉकीपटू सरदार सिंग, महिला क्रिकेटर मिताली राज, बॅडमिंटन पटू किदंबी श्रीकांत, पीव्ही सिंधू यासर्वांना सचिनने नॉमिनेट केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील चॅलेंज दिले आहे. या सर्व खेळाडूंनी मास्टर ब्लास्टरचे हे चॅलेंज स्वीकारले आहे. सचिनचे हे चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर खेळाडू पूर्ण करतात का? हे लवकरच कळेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

India vs Pakistan | भारताचे हे शिलेदार करणार पाकिस्तानचा सामना

News Desk

दुसरीत शिकणा-या मुलीचा शिक्षकाने केला लैंगिक शोषण

swarit

Asia Cup 2018 | विराट ऐवजी रोहित शर्मा करणार नेतृत्त्व

News Desk
राजकारण

प्लास्टिक बंदी पक्षाचा गल्ला भरण्यासाठी की पर्यावरणाच्या रक्षणासाठी – नवाब मलिक

swarit

मुंबई | राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू करताच मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि नागपूर महापालिकांकडून धडक कारवाई करण्यात आली. प्लास्टिक बंदीने व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांना पेचात पाडले आहे. प्लास्टिक वापरले की प्रशासन दंडात्मक कारवाई करत आहे. मात्र प्लास्टिक पिशव्यांना ठोस पर्याय उपलब्ध नसल्याने सर्वांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

ज्या वस्तुंचा पुर्नवापर होतो त्यावर बंदी आणि ज्या वस्तुंचे रिसायकल होत नाही त्यावर बंदी नाही. सरकारची ही अभ्यासपूर्ण प्लास्टीक बंदी पर्यावरणाच्या रक्षणासाठी की पक्षाचा गल्ला भरण्यासाठी की तोडपाणीसाठी असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना आणि भाजपवर केला.

तसेच यावेळी बोलताना मलिक म्हणाले, सरकारने प्लास्टीक बंदी करताना अभ्यास केलेला नाही. हा निर्णय राजकीय फायदा होण्यासाठी आणि जनतेला अडचणीत आणण्यासाठी घेण्यात आला आहे. विदेशी कंपन्यांच्या दबावामुळे सरकारने रिसायकल वस्तूंवर बंदी आणली नाही. याचा अर्थ सरकारचा उद्देश आणि नियत साफ नव्हती असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

Related posts

महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात आज सुरू; पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार सुनावणी

Aprna

आदिवासींच्या हितासाठी ओडिसा सरकारने निवडणुकांची वाट पाहू नये !

News Desk

“शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात निष्ठावंतांना स्थान नाही”, आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

Aprna