HW News Marathi
क्रीडा

जेष्ठ पत्रकार रजत शर्मा डीडीसीएचे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली | इंडिया टीव्हीचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक रजत शर्मा यांची दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. रजत शर्मा यांना माजी क्रिकेटर मदनलाल यांचा पराभूत करत क्रिकेटमध्ये नवीन इंनिकची सुरुवात केली आहे.

रजत शर्मा यांना १५३१ मते आणि मदनलाल यांना १००४ अशी मते मिळाली आहे. तसेच शर्मा यांच्या पॅनेलने बारापैकी बारा जागा जिंकल्या आहेत. डीडीसीए असोसिएशन कार्यकारणीने २७ ते ३० जून रोजी निवडणूक घेतली होती. आज या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले.

शर्मा यांनी विजयी झाल्यानंतर त्यांनी मतदारांचे आभार मानले आहे. लवकरच डीडीसीएचा कारभारात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रजत शर्मा यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हॉकी विश्वचषक स्पर्धेचा आज उद्घाटन सोहळा

News Desk

अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण, बीसीसीआयच्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी

News Desk

भारतीय महिला कबड्डी संघाला रौप्य पदक

News Desk
मुंबई

कुर्ल्याचा हरियाणा वाला लेन परिसर अंधारात

swarit

मुंबई | कुर्ला पश्चिमेच्या हरियाणा वाला लेन परिसरातील प्रवेश द्वारासमोर असलेले पथदिवे तसेच वासनजीपाचू चाळीच्या समोरील पथदिवा गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने रात्रीच्या वेळी परिसरात काळोखाचे साम्राज्य पसरून स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे. संबंधीत प्रशासनाने सदरचे पथदिवे त्वरीत दुरुस्त करावेत.

या परिसरातील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. बंद असलेल्या पथदिव्यांमुळे परिसरात अंधार पसरत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे अपघात, चोऱ्या आदी प्रकार घडण्याची शक्यता आहे. तसेच महिलांना या वर्दळीच्या जागेतून ये-जा करताना भीती वाटत असल्याचे काही महिलांनी सांगितले. त्यामुळे लवकरात लवकर हे पथदिवे चालू करुन नागरिकांचे हाल थांबवावेत. अशी मागणी नागरिक करत आहेत.

Related posts

क्रॉफर्ड मार्केटच्या दुसऱ्या टप्प्यातील पुनर्विकास कामाला गती मिळणार   

Gauri Tilekar

वरिष्ठांनी झापले म्हणून कर्मचा-याने घेतला गळफास

News Desk

ताडदेव आरटीओ कँटीनमध्ये आग 

swarit