HW News Marathi
क्रीडा

ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन  

मुंबई | क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात वाडेकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वातील मोठा तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. परदेशी भूमीवर भारताला विजयाची सवय लावून देणारा कर्णधार अशी वाडेकर यांची वेगळी ओळख होती.

वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने परदेशात पहिली कसोटी मालिका जिंकली होती. 1971 मध्ये वाडेकरांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या बलाढ्य संघांचा त्यांच्याच मायदेशात पराभव केला. १९५८ पासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात करणाऱ्या वाडेकरांनी १९६६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १९६६ ते १९७४ या कालावधीत वाडेकर भारतीय संघाकडून खेळले. आंतरराष्ट्रीय स्तरावर ते एकूण ३७ कसोटी सामने खेळले. यामध्ये त्यांनी एक शतक आणि चौदा अर्धशतके झळकवली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आशिया चषकात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

News Desk

लंच आधी शतक करणारा शिखर धवन पहिला भारतीय फलंदाज

News Desk

बीसीसीायकडून अभिनंदनच्या नावाची जर्सी लॉन्ज करून अनोखी सलामी

News Desk
मुंबई

मुंबईत असे सुरू झाले नामांतरण…

News Desk

मुंबई | ब्रिटिश काळापासून बॉम्बे म्हणून ओळख असलेल्या मुंबापुरीचे नाव बदलून १९९५ मध्ये मुंबई करण्यात आले. त्यानंतर ब्रिटिश काळात देण्यात आलेली सर्व नावे बदलण्याची मागणी होऊ लागली आहे. या नामकरणाची सुरुवात व्हिक्टोरिया टर्मिनसपासून झाली. पश्चिम उपनगरातील गोरेगाव आणि जोगेश्वरीमधील नवीन स्थानकाचे नाव राम मंदिर ठेवण्यात आले.

१९ जुलै २०१८ पासून एल्फिन्स्टन रोड स्थानक ‘प्रभादेवी’ असे ओळखले जाऊ लागले. तसेच १८३५ ते १८३९ या काळात त्या काळातील बॉम्बेचे राज्यपाल असलेले सर रॉबर्ट ग्रॅण्ट यांच्या नावाने असलेले ग्रॅण्ट रोड स्थानकाचे नाव बदलून ग्रामदेवी, करी रोड स्थानकाचे नाव लालबाग रेल्वे स्थानक, सँडहर्स्ट रोडचे नाव डोंगरी तर हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन स्थानकाचे नाव काळाचौकी, रे रोडचे नाव घोडपदेव करण्याची मागणी होत आहे.

देशभरात गुरुवार ६ डिसेंबर रोजी बाबासाहेबांना महापरीनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी देखील भीम आर्मी संघटनेकडून दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Related posts

एकतर्फी प्रेमातून तरूणीवर चाकूहल्ला

News Desk

परमबीर सिंह का नाही बनले मुंबईचे पोलीस आयुक्त ?

News Desk

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग, ८ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

swarit