HW News Marathi
क्रीडा

स्टीव्हन स्मिथ आणि वॉर्नरवर एका वर्षाची बंदी

मेलबर्न | ऑस्ट्रेलियन टीमचे कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांना त्यांच्या पदावरुन पायउतार केले आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणी दोषी आढळल्यामुळे त्यांना आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यावर एका वर्षाची बंदी लावण्यात आली आहे. कॅमेरुन बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्याची बंदी घालण्यात आली आहे. हे तिन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडू बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळले आहेत. या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी ऑस्ट्रेलियन नागरिकांची जाहीर माफी मागितली आहे.

डेव्हिड वॉर्नरला आयपीएलमधील हैदराबाद टीमचा कर्णधार पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ हे खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार की नाही, याबाबत येत्या काही दिवसात आयपीएलच्या वतीने निर्णय घेण्यात येईल.

  • बॉल टॅम्परिंग प्रकरण

दक्षिण ऑफ्रिके विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला यांनी अवैधरित्या चेंडू हाताळताना टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यात कैद झाले. हा खेळाच्या रणनितीचाच एक भाग असल्याचे स्मिथ यांने सांगितले. यानंतर स्टीव्हन स्मिथ यांने ऑस्ट्रेलियन टीमच्या कर्णधार आणि डेव्हिड वॉर्नर याला उपकर्णधार पदावरुन तातडीने हटवण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजिंक्य रहाणेच्या कॅचची क्रिकेट विश्वात चर्चा

News Desk

उसेन बोल्टचे व्यावसायिक फुटबॉल विश्वात पदार्पण

News Desk

मी स्पॉट फिक्सिंग केलीच नाही !

News Desk