HW Marathi
क्रीडा मुंबई

चौथ्यांदा विजेतेपद भूषविणाऱ्या मुंबई इंडियन्सची आज मिरवणूक

मुंबई | आयपीएल २०१९ चे जेतेपद मुंबई इंडियन्सने पटकविले आहे. चेन्नई सुपर किंग्जला काल (१३ मे) एका धावाने मुंबई इंडियान्सने पराभव करत चौथे विजेते पदक मिळविले आहेत. चौथ्यांदा विजेते पदक पटकविणारे मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील पहिला संघ ठरला आहे. मुंबई विजयी झाल्यानंतर आज (१३ मे) संध्याकाळी ६.३० वाजता व्हिक्टरी मार्च काढण्यात येणार आहे.

मुंबई इंडियन्सने यापूर्वी २०१३,२०१५, २०१७ आणि २०१९ साली आयपीएलचा विजेते पदकावर आपले नाव कोरले आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया (त्यांच्या निवासस्थानाचे नाव) ते पंचतारांकित हॉटेल ट्रायडंटपर्यंत व्हिक्टरी मार्च होणार आहे. ओपन बसमध्ये मुंबई इंडियन्स संघातील सर्व खेळाडू चषकासह चाहत्यांना अभिवादन करतील. यावेळी बुमराह, रोहित शर्मा, मलिंगा यांना पाहण्यासाठी चाहत्यांना संधी मिळणार आहे.

मुंबई इंडियन्सने किरॉन पोलार्डच्या ( २५ चेंडूंत नाबाद ४१ धावा ) धडाकेबाज खेळीच्या जोरावर ८ बाद १४९ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला ७ बाद १४८ धावांपर्यंतच मजल मारता आली. शेन वॉटसनने ( ८० धावा) एकाकी झुंज दिली. पण, अखेरच्या षटकात लसिथ मलिंगाने चेन्नईच्या तोंडचा घास पळवला आणि मुंबईचे चौथ्यांदा आयपीएलचा चषक उंचावला.

 

 

Related posts

चीनी चोरट्यांनी मुंबईतून चोरला ३४ लाखांचा हिरा

News Desk

निवासी डॉक्‍टरांना थेट प्रशासनापुढे समस्या मांडता येणार

News Desk

#PulwamaAttack : नालासोपारामध्ये पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ रेल रोको आंदोलन

News Desk