मुंबई | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. क्रिकेटच्या मैदानात नेहमी दमदार बॅटिंग करून कामगिरी करणाऱ्या विरोधी संघाचा पराभव करणाऱ्या कोहली नव्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. विराटने स्वत: ट्विट करून नव्या लूकचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. परंतु हे पोस्टर नेमके कशाचे आहे.
Another debut after 10 years, can't wait! 😀 #TrailerTheMovie https://t.co/zDgE4JrdDT pic.twitter.com/hvcovMtfAV
— Virat Kohli (@imVkohli) September 21, 2018
विराटने दाह वर्षांनंतर आणखी एक पदार्पण, आता वाट पाहवत नाही, असे ट्विट करुन चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केले आहे. “Trailer: The Movie” असे टायटल असलेल्या फोटोत विराटने अॅक्शन हिरोप्रमाणे पोझ दिलेली पाहायला मिळत आहे.
विराटने हे पदार्पण बॉलिवूडमध्ये नसून त्याच्या ब्रॅण्डसाठी असल्याची चर्चा आहे. विराटच्या wrogn.in हा कपड्यांचा ब्रॅण्ड आहे. wrogn.in या वेबसाईटवर विराटच्या वॉर्डरोबपासून प्रेरित असलेल्या कपड्यांची विक्री होते. आता विराट trailerthemovie.com वर कपड्यांची विक्री करणार असून २८ सप्टेंबरला ही वेबसाईट लॉन्च होणार असल्याचे म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.