HW News Marathi
क्रीडा

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना आज रंगणार

सेंट पीटर्सबर्ग | फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्स आणि बेल्जियम या दोन संघात पहिला उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या लढतीत बलाढ्य फ्रान्स संघाला पराभूत करून बेल्जियम संघ प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणार का? याबाबत दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसत आहे.

फिफा विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीतला पहिला मुकाबला आज रात्री साडेअकरा वाजता खेळण्यात येणार आहे. या सामन्यात ह्यूगो लॉरिसच्या बलाढ्य फ्रान्सची गाठ एडन हॅझार्डच्या बेल्जियमशी पडणार आहे. फ्रान्स आणि बेल्जियम हे या विश्वचषकातले तुल्यबळ संघ असून या दोन्ही संघांना यंदा विश्वचषकामध्ये फुटबॉल चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

त्यामुळे हा सामना जिंकून फायनलमध्ये कोण धडक मारणार, याविषयी फुटबॉलरसिकांमध्ये उत्सुकता आहे. विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सनं उरुग्वेचा तर बेल्जियमनं ब्राझिलचा पराभव करत उपांत्य फेरत धडक मारली होती. त्यामुळे आता हे दोन्ही तुल्यबळ संघ अंतिम फेरीच्या तिकीटासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोहलीचा नवा विक्रम, सचिनला टाकले मागे

News Desk

अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण, बीसीसीआयच्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी

News Desk

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी

swarit
देश / विदेश

समलैंगिकतेवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार

News Desk

नवी दिल्ली | समलैंगिकता हा अपराध मानणाऱ्या आयपीसी ३७७ कलम घटनाबाह्य करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. न्यायायातील ५ न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. या निर्णयावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

२००९ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एकमेकांच्या सहमतीने ठेवण्यात आलेले समलैंगिक संबंध गुन्हा ठरू शकत नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर आक्षेप घेत समलैंगिक संबंधास आयपीसीच्या कलम ३७७ अन्वये अवैध ठरवले. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने २०१३ साली समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरविणारा निकाल दिला होता. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय घेते हे पाहणे औसुक्याचे ठरेल.

आयपीसी कलम ३७७ म्हणजे काय ?

आयपीसीच्या कलम ३७७ अन्वये दोन लोक एकमेकांच्या सहमतीने किंवा असहमतीने अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित करतील तर समलैंगिकता हा गुन्हा ठरविण्यात येतो. या कलमानुसार गुन्ह्यातील आरोपींना १० वर्षापासून ते जन्मठेपपर्यंतची शिक्षा देण्याची तरतूद आहे. हा अजामीनपात्र गुन्हा आहे.

Related posts

शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? कॉंग्रेसच्या या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणतात…

News Desk

संघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही | डॉ. भागवत

News Desk

पाकिस्तानचे दहशतवाद्यांवरील कारवाईचे सर्व दावे खोटे !

News Desk