HW News Marathi
Uncategorized

बेरोजगारांना पाच लाख कमावण्याची संधी

मुंबईः सुशिक्ष‌ित बेरोजगारांसाठी पाच लाख रुपयांचे भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने योजना आखली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे बेरोजगारांना पाच लाखांचे कर्ज उपलब्ध करून मिळणार आहे. कौशल्ये विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ही योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत बेरोजगार उमेदवारांना पाच लाखांपर्यंत व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकेचा सहभाग ६० टक्के व महामंडळाचा ३५ टक्के आहे. तर, उर्वरित पाच टक्के रक्कम अर्जदाराची असते. राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकल्प रकमेच्या ३५ टक्के रक्कम महामंडळामार्फत बीज भांडवल म्हणून देण्यात येते. या रकमेवर द.सा.द.शे. अवघे चार टक्के व्याज आकरण्यात येते. बीज भांडवल कर्ज योजनेच्या परतफेडीचा कालावधी पाच वर्षांचा राहील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्ध्या महाराष्ट्रात पावसाची दडी, खरिप वाया जाण्याची भीती

News Desk

उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेनेच्या आमदारांची बैठक

News Desk

NIA ने वाझेंवर वरदहस्त ठेवणाऱ्या नेत्यापर्यंत पोहचले पाहिजे ! राऊतांकडे रोख ठेवत काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया

News Desk