HW News Marathi
Uncategorized

उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेनेच्या आमदारांची बैठक

मुंबई | राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याऐवजी वाढत जाताना दिसत आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांची शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) दुपारी २ वाजता बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भातील संभ्रमवस्थेवर आमदारांना उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत.

तसेच राज्यात शिवसेना -कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे तीन पक्ष मिळून राज्यात महाशिवआघाडीचे सरकार येणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र, शिवसेनेला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पाठिंब्या देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (१९ नोव्हेंबर) दोघांच्या भेटीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर सत्ता स्थापनेचा तिढा सुटेण्याऐवजी वाढला आहे. त्यानंतर शिवसेनाही गोंधळात पडली आहे. यामुळे आमदारांसोबत संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलविली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांशी नेमके काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागेल आहे.

तसेच कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काल (१९ नोव्हेंबर) मल्लिकार्जुन खर्गे, ए. के. ऍटोनी आणि अहमद पटेल यांच्यासोबत बैठक घेतली. यात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेबाबत कॉंग्रेसची भूमिका लवकरच स्पष्ट होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Karuna Sharma यांच्या बाजूने पंकजा मुंडे सरसावल्या, Dhananjay Munde यांच्यावरती कडाडून टिका !

News Desk

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टरांनी मांत्रिका बोलावले, रूग्ण महिलेचा मृत्यू

News Desk

विमानाचे तिकीट मिळणार रेल्वे अॅपवरून

News Desk