HW News Marathi
Uncategorized

व्याज दरात कपातीची शक्यता, महागाई कमी झाल्याने शेअर बाजाराची झेप

 

सेन्सेक्स 32 हजारावर, निफ्टीचाही विक्रम

मुंबई-शेअर बाजाराच्या निर्देशांकाने गुरुवारी प्रथमच 32 हजारांचा टप्पा पार करून विक्रम केला. सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्सने २०० अंकांची उसळी घेतली. तर निफ्टीने ५० अंकांची उसळी घेत दहा हजाराजवळ झेप घेतली. दरम्यान, महागाई निर्देशांक 1.72 इतक्या निच्चांकी स्तरावर आला. गेल्या पाच वर्षातीला हा निच्चांकी निर्देशांक आहे.

ठोक महागाई कमी होण्याची चिन्हे दिसत असून यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. महागाई दर खाली आल्याने आता आरबीआयने व्याजदरात कपात करण्याची मागणी रेटा धरण्याची शक्यता आहे.

सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी सेन्सेक्सने २०४ अंकांनी उसळी घेत ३२ हजारांचा टप्पा गाठला. यानंतर ३२ हजार ०२० पर्यंत जात इतिहास रचला. यावेळी निफ्टी ५० ने ५० अंकांची वाढ नोंदवत ९ हजार ८७६ पर्यंत झेप घेतली. आयटीसी,आयसीआयसीआय बँक, लार्सन, अॅक्सिस बँक,एनटीपीसी, भारती एअरटेल या कंपन्यांच्या समभागांनी १ टक्क्याहून अधिकची वाढ नोंदवली आहे. याशिवाय टाटा स्टील, एचडीएफसी, हिरो मोटोकॉर्प, एशियन पेंट्स या कंपन्यांनीदेखील चांगली कामगिरी केली आहे.

रिझर्व्ह बँकेकडून व्याज दरात कपात होण्याचा अंदाज असल्याने शेअर बाजारात तेजी निर्माण झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. यासोबतच बुधवारी महागाईचा दरदेखील जाहीर झाला. महागाईत घट झाल्याचा चांगला परिणाम शेअर बाजारावर होताना पाहायला मिळतो आहे. जूनमधील महागाईचा दर १.५४ टक्के इतका होता. याआधी मे महिन्यात केंद्र सरकारला महागाईपासून मोठा दिलासा मिळाला होता. एप्रिलमध्ये २.९९ टक्के असणारा महागाई दर थेट २.१८ टक्क्यांवर असल्याने केंद्र सरकारला दिलासा मिळाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमिरचे चाहत्यांना भावनिक आवाहन

News Desk

वर्षाखेरीस जहीर-सागरिकाचा शुभमंगल..

News Desk

ऑनलाइन सेक्स चॅटींगच्या नावाने पैसे उकळण्याचा गोरखधंदा तेजीत EXCLUSIVE

News Desk