HW News Marathi
Uncategorized

बारामतीत आणखी १ कोरोना पॉझिटिव्ह, सर्वत्र चिंतेंचे वातावरण

बारामती | बारामतीत आज (६ एप्रिल) आणखी १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण समर्थनगर बारामती येथील असून त्याच्या कुटुंबीयांचा भाजीपाला विकण्याचा व्यवसाय आहे. त्यामुळे अनेक लोकांना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे बारामतीकरांनी घराबाहेर विनाकारण न पडण्याचे आवाहन केले आहे.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता समर्थ नगर हे केंद्र धरुन ३ किमी परिसर कंटेंमेंट झोन म्हणुन आणि ५ किमीचा परिसर बफर झोन म्हणुन घोषित करण्यात आली आहे. या क्षेत्रातील वाहतुकही नियंत्रीत करण्यात येत आहे.अत्यावश्यक सेवा वगळता बाकी साऱ्या गोष्टी बंद आहेत.तसेच, कोरोनाचे संकट लक्षात घेता नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय बाहेर पडू नये, असे सक्तीनेही सांगण्यात आले आहे. ज्या ठिकाणी कंटेंमेंट झोन आहे तिथे कोणी आल्यास त्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. सर्व वाहनांचीही तपासणी करण्यात येत आहे. तसेच त्या भागात आरोग्य विभागामार्फत सर्वेही करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखण्याचे मोदींचे आवाहन

News Desk

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Nandurbar | नंदुरबार मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

आरोग्याचा विषय सोडला तर काहीच महत्त्वाचा अजेंडा नसताना अट्टाहास का?

swarit