HW News Marathi
Uncategorized

Corona Virus | पिंपरीत आणखी ३ जण कोरोना पॉझिटिव्ह

पिंपरी | कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव राज्याभरात वाढत चालला असून, पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी ३ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या ५ संशयित रुग्णांचा नुकताच रिपोर्टआला असून त्यापैकी ३ रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता १४ वर पोहोचली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना विषाणूच्या ५ संशयित रुग्णांना वायसीएम रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले होते. त्यांची तपासणी केली असता, ५ पैकी ३ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. उर्वरित २ जणांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. या दोघांना घरी सोडण्यात आले आहे. तर लागण झालेल्या ३ रुग्णांना उपचारासाठी वायसीएममधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शशिकलाची 1400 कोटींची संपत्ती जप्त

News Desk

ट्रम्प यांनी रोखलेल्या WHO च्या निधीवर बिल गेट्स यांनी दिले उत्तर

News Desk

“मिटकरी हे लोकशाहीवादी विचाराचा नेता नाही”, महेश शिंदेंची धक्काबुक्कीनंतरची पहिली प्रतिक्रिया

Aprna