HW News Marathi
Uncategorized

राज्यात कोरोनाबाधित ७२२ जणांना डिस्जार्ज, एकूण रुग्ण संख्या ५२१८

मुंबई । राज्यात आज कोरोनाबाधित ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५२१८ झाली आहे. १५० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४२४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२१ एप्रिल) दिली.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ७ हजार ८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १२, पुण्यातील ३, ठाणे मनपामधील २ तर सांगली येथील १ आणि पिंपरी चिंचवड येथील १ रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १० पुरुष तर ९ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या

मुंबई महानगरपालिका – ३४५१ (१५१)

ठाणे – २२ (२)

ठाणे मनपा – १५० (४)

नवी मुंबई मनपा – ९४ (३)

कल्याण डोंबिवली मनपा – ९३ (२)

उल्हासनगर मनपा – १

भिवंडी निजामपूर मनपा – ६

मीरा भाईंदर मनपा – ८१ (२)

पालघर – १८ (१)

वसई विरार मनपा – १११ (३)

रायगड – १६

पनवेल मनपा – ३४ (१)

ठाणे मंडळ एकूण – ४०७७ (१६९)

नाशिक – ४

नाशिक मनपा – ६

मालेगाव मनपा – ८५ (८)

अहमदनगर – २१ (२)

अहमदनगर मनपा – ८

धुळे – २ (१)

धुळे मनपा – २

जळगाव – १

जळगाव मनपा – २ (१)

नंदूरबार – ४

नाशिक मंडळ एकूण – १३५ (१२)

पुणे – १९ (१)

पुणे मनपा – ६४६ (५२)

पिंपरी चिंचवड मनपा – ५१ (२)

सोलापूर मनपा – २५ (२)

सातारा – १३ (२)

पुणे मंडळ एकूण – ७५४ (५९)

कोल्हापूर – ६

कोल्हापूर मनपा – ३

सांगली – २६

सांगली मिरज कुपवाड मनपा – १ (१)

सिंधुदुर्ग – १

रत्नागिरी – ८ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण – ४५ (२)

औरंगाबाद – १

औरंगाबाद मनपा – ३४ (३)

जालना – १

हिंगोली – १

परभणी मनपा – १

औरंगाबाद मंडळ एकूण – ३८ (३)

लातूर – ८

उस्मानाबाद – ३

बीड – १

लातूर मंडळ एकूण – १२

अकोला – ७ (१)

अकोला मनपा – ९

अमरावती मनपा – ६ (१)

यवतमाळ – १६

बुलढाणा – २१ (१)

वाशिम – १

अकोला मंडळ एकूण – ६० (३)

नागपूर – ३

नागपूर मनपा – ७६ (१)

गोंदिया – १

चंद्रपूर मनपा – २

नागपूर मंडळ एकूण – ८२ (१)

इतर राज्ये – १५ (२)

एकूण – ५२१८ (२५१)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेरीवाल्यांना हटवल्या प्रकऱणी मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक

News Desk

माझा मुलगा निर्दोष आहे, प्रद्युम्न हत्या प्रकरणात माझ्या मुलाला अडकवलं जातंय

News Desk

धारावीतील ‘त्या’ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू

Gauri Tilekar