मुंबई | महाराष्ट्रातील मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. मुंबईतील शुश्रुषा रुग्णालयात दोन परिचारिकांना ‘कोरोना’ची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती मिळातच खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका रुग्णालय सील करण्याच्या तयारीत आहे. तसेच या रुग्णालयात प्रवेश करण्यात पालिकेने मज्जाव करण्यात निर्णय घेण्याची शक्यात वर्तवली जात आहे.
Shushrusha Hospital has also been asked to get all quarantined nurses tested, BMC will take a call on shifting these nurses to some other hospital once their test results come: BMC #COVID19 https://t.co/VkD0uwLW8v
— ANI (@ANI) April 10, 2020
रुग्णलायत अॅडमिट असलेल्या सर्व रुग्णांना पुढील ४८ तासांत डिस्चार्ज देऊन दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. या दोन्ही परिचारिक कोरोना पॉझिटिव्ही असून त्यांना परिचारिकांना शुश्रुषा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. यानंतर या दोन्ही परिचारिकांचा चाचणी केली जाणार आहे. या परिचारिकांचा अहवाल आल्यानंततर त्यांनी दुसऱ्या रुग्णालयता हलविण्यात येणार आहे.
दादरमध्ये आजच्या (१० एप्रिल) दिवसात ‘कोरोना’चे तीन नवे रुग्ण आढळले आहेत. यात ‘शुश्रुषा’ हॉस्पिटलमधील दोन नर्स शिवाय ८० वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. रुग्णालयातील २७ वर्षीय आणि ४२ वर्षीय परिचारिकांचे कोरोना अहवाल काल (९ एप्रिल) पॉझिटिव्ह आले आहेत. आता दादरमधील कोरोनाबाधितांची संख्या सहावर पोहोचली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.