HW News Marathi
Uncategorized

अमरावती शेतकऱ्याच्या मुलाची इंडियन नॅशनल क्रिकेट टीममध्ये निवड

अमरावती जिल्हयातील अ-हाड –कु-हाड गावातील शेतक-याच्या मुलाची भारताच्या इंडियन नॅशनल अंडर 10 क्रिकेट टीममध्ये निवड झाली. भारतातील 800 क्रिकेट खेळणा-यां मुलांची चाचणी घेण्यात आली. यात फक्त 17 मुलांची निवड झाली.

नेहाल शांताराम खडसे अत्यंत जेमतेम परिस्थिती असलेल्या नेहाल हा अकरावीत शिकत असून , वयाच्या दहाव्या वर्षांपासून क्रिकेट खेळयाला त्याने सुरुवात केली. सुरुवातीला आई वडिलांनी नेहालच्या खेळाकडे दुर्लक्ष केलं मात्र मुलाची आवड पाहून परिस्थिती नसताना शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून उसने पैसे घेऊन त्यांनी नेहालला मुंबई येथील क्रिकेट परफॉर्म पॉईंटमध्ये सराव करायला पाठवले. या अकॅडेमीचे आरिफ हुसेन यांनी नेहालला क्रिकेटचे धडे दिले. नेहालनेही जिद्दीने सराव केला. श्रीलंका येथे होणाऱ्या भारतीय टीममध्ये नेहालची विकेट किपर म्हणून निवड झाली.

विशेष म्हणजे या टीमचे कोच राहुल द्रविड आहेत , श्रीलंकेतही टीम २ वन डे, १ टेस्ट व तीन २०-२० मॅचेस खेळणार आहेत. याच संघातून जुनियर आय पी एल व नंतर चांगला परफॉर्मंन्स करनाऱ्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय आय पी एल साठी निवड केली जाणार आहे. नेहालची आई व त्याच्या मित्रांना नेहाल सचिन तेंडुलकर सारखा मोठा क्रिकेटर व्हावा असे वाटते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मेट्रो’ ३ च्या संचालक अश्विनी भिडेंना राज्याच्या प्रधान सचिवपदी पदोन्नती

News Desk

राज्यात कोरोनाबाधित ७२२ जणांना डिस्जार्ज, एकूण रुग्ण संख्या ५२१८

News Desk

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुनगंटीवारांनी केले मोठे विधान

Aprna